रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात १७ टक्के वाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 10:15 PM2020-08-09T22:15:57+5:302020-08-10T00:27:10+5:30
नाशिक : जिल्ह्यात रु ग्ण पूर्णपणे बरे होण्याची टक्केवारी जुलै महिन्याच्या प्रारंभी ५७ टक्क्यांच्या आसपासइतकी झाली होती. त्यात चांगलीच भर पडून आॅगस्ट महिन्याच्या पूर्वार्धात हे प्रमाण ७५ टक्क्यांच्या नजीक पोहोचले आहे. महिनाभरात सुमारे १७ टक्के इतकी वाढ झाली असल्याने नाशिककरांच्या दृष्टीने ती दिलासादायक बाब आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण वाढत असतानाच दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जून महिन्याच्या प्रारंभी रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण केवळ ५० टक्क्यांच्या आसपास होते. त्यानंतर जूनच्या अखेरीस त्यात सुमारे ११ टक्के वाढ होऊन ते प्रमाण ६१ टक्क्यांच्या आसपास पोहोचले होते, तर जुलै महिन्याच्या प्रारंभी त्यात घट होऊन ते प्रमाण ५७ टक्क्यांवर आले होते.
कोरोनाबाधितांमध्ये वेगाने वाढ होत असली तरी जिल्ह्यातील बाधित बरे होऊन घरी परतण्याच्या प्रमाणातही गत महिनाभरात झालेली वाढ जिल्ह्याच्या दृष्टीने विशेष दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण ७४.९१ टक्केजिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण सातत्याने वाढत असून, जिल्ह्यातील ग्रामीण भागामधून रु ग्ण बरे होण्याचे प्रमाण ७३.२४ टक्के इतके आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ७४.९२ टक्के, मालेगाव मनपामधून ७९.०४ टक्के व जिल्हाबाहेरील ८२.५८ टक्के इतके आहे. जिल्ह्याचे रुग्ण बरे होण्याचे सरासरी प्रमाण ७४.९१ टक्क्यांवर पोहोचले आहे. तसेच आतापर्यंत बळी गेलेल्या सहाशेच्या आसपास असलेल्या रुग्णांपैकी जवळपास निम्मे रुग्ण हे ज्येष्ठ नागरिक श्रेणीतील होते. त्यांना कोरोनाबरोबरच अन्य काही आजारांनीदेखील ग्रासले होते, असा प्रशासनाचा दावा आहे.