१७ दुचाकीसह नउ लाखाचा मूद्देमाल हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 05:21 PM2017-09-27T17:21:42+5:302017-09-27T17:21:47+5:30
सिडको : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरी करुन त्या बाहेरगावी विकणाºया तीन संशयीत आरोपींना अंबड पोलीसां अटक केली असून त्यांच्याकडून १७ दुचाकी हस्तगत केल्या असून ९ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहीती पोलीसांनी दिली.
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महीण्यापासुन दुचाकी चोरीचे सत्र सुरु झाले होते. यामुळे या दूुचाकी चोरट्यांना ताब्यात घेण्यासाठी अंबडचे वरीष्ट पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी वरीष्ठाच्या आदेशान्वये स्वतंत्र पथकाची नेमणूक केली होती. संशयीतांनी चोरी केलेल्या दुचाकी ह्या नंबरप्लेट बदलुन चाळीसगाव भागात व्रिकी केल्या जात असल्याची गुप्त माहीती पोलीसांनी मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक तुषार चव्हाण व त्यांच्यासह पोलीस उपनिरक्षक विजय पवार, शेळके, विष्णू हाळदे, भास्कर मल्ले, दत्तत्रय गवारे, अवि देवरे, विजय वरंदळ,हेमंत आहेर.चंद्रकांत गवळी,मनोहर कोळी या टिम ने चाळीसगाव येथे जावुन रात्रभर चोरट्यांचा सुगावा लावात त्यांना ताब्यात घेतले. या संशयीत चोरट्यांमध्ये अभिषेक विश्वकर्मा(१९),रा. अंबड,राजेश नरवाडे(२१),रा.अंबड,गोरख हिरे(२६)रा.तालुका भडगाव ,जिल्हा जळगाव आदींचा समावेश आहे. या चोरट्यांकंडून एफझेड,पल्सर,पॅशन प्रो,मॅस्ट्रो,शाइन अशा विविध कंपण्याच्या दुचाकी हस्तगत केल्या. संशयीतांची चौकशी केली असता त्यांनी चोरी केलेल्या सर्व दुचाकी ह्या चाळीसगाव येथे विकल्याची कबूली दिली असून या संशयीतांकडून अजुनही चोरी केलेल्या काही दुचाकी मिळºयाची शक्यात पोलीसांनी वर्तविली आहे.