१७ हजार ९६६ विद्यार्थी अकरावीत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:12 AM2021-01-10T04:12:19+5:302021-01-10T04:12:19+5:30
नाशिक : शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू असून, दुसऱ्या विशेष फेरीत निवड झालेल्या १ हजार ८७५ पैकी ...
नाशिक : शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू असून, दुसऱ्या विशेष फेरीत निवड झालेल्या १ हजार ८७५ पैकी १ हजार २३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले असून, आत्तापर्यंत एकूण १७ हजार ९६६ विद्यार्थी अकरावीत दाखल झाले आहेत, तर अजूनही ७ हजार ६०६ जागा रिक्त असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली आहे.
नाशिक शहरातील ६० कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान आणि संयुक्त शाखांसाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया होत असून, आतापर्यंत तीन नियमित फेऱ्या व दोन विशेष फेऱ्या पूर्ण झाल्या आहे. यात आतापर्यंत १७ हजार ९६६ हून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून, रिक्त असलेल्या ६ हजार ३६८ जागांसाठी शिक्षण विभागातर्फे तिसरी विशेष फेरी घेतली जाणार आहे. दुसऱ्या विशेष फेरीसाठी ५ जानेवारी रोजी गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर १ हजार ८७५ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवार(दि. ८)पर्यंत प्रवेश निश्चित करण्याची मुदत होती. मात्र, यात एक दिवसाची मुदतवाढ मिळाल्यानंतर शनिवारी (दि.९) दुसरी विशेष फेरी पूर्ण झाली.
इन्फो
फेरीनिहाय असे झाले प्रवेश
फेरी - उपलब्ध जागा - पात्र विद्यार्थी - निवड - प्रवेश
प्रथम - २२,३२५ - २१,७४९ - १२,०९४ - ७,०३३
द्वितीय -१५,२९२ - १५,२७१ - ६,७६९ - २,५०६
तृतीय - १२,७८६ - ११,५६८ - ४,१११ - १,४२६
प्रथम विशेष - ११,३६० - ६,०२५ - ४,९१० - ३,७५४
द्वितीय विशेष - ७,६०६ - २,९२२ - १,८७५ - १,२३८