साताळीसह १७गावे दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 05:37 PM2018-11-12T17:37:47+5:302018-11-12T17:38:05+5:30

येवला : दुष्काळी गावाच्या यादीत साताळीसह१७ गावांचा समावेश करावा याकरिता साताळी येथील ग्रामस्थांनी तहसिल कार्यालयावर दोन तास धरणे धरून शासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला.

 17 villages, including Satali, are demanded to be included in the drought-hit list | साताळीसह १७गावे दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी

साताळीसह १७गावे दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी

Next
ठळक मुद्दे धरणे आंदोलन: येवला तहसिल कार्यालयावर धरणे


येवला :
दुष्काळी गावाच्या यादीत साताळीसह१७ गावांचा समावेश करावा याकरिता साताळी येथील ग्रामस्थांनी तहसिल कार्यालयावर दोन तास धरणे धरून शासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला. साताळीसह १७ टंचाईग्रस्त गावे दुष्काळ यादीतून वगळल्याने फार मोठा अन्याय शासनाने या गावांवर केला. दुष्काळी गावांना मिळणा-या सवलतीपासून सर्व शेतकरी, शेतमजुरी वंचित राहणार असल्याने या गावात व परिसरात तीव्र असंतोष आहे. शहरात पाऊस पडतो मात्र हा लहरी पाऊस शहराच्या दिड किमी परिसरात देखील पडत नाही. त्यात साताळीसह १७ गावे येवला मंडळामध्ये येत असल्याने आण िमंडळिनहाय दुष्काळ याद्या जाहिर केल्याने या गावावर अन्याय झाला असून शासनाने तात्काळ या गावाची पहाणी करावी व या गावांचा दुष्काळ यादीत समावेश करावा या एकाच मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शेतकरी पंचायतीचे राज्य संघटक व साताळी ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष व अर्जुन कोकाटे यांचे नेतृत्वाखाली तहसिल कार्यालयासमोर जवळपास दोन तास धरणे धरण्यात आले .त्यानंतर तहसीलदार देवीदास वारूळे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात साताळीसह १७ गावांचा तात्काळ समावेश करावा अन्यथा सर्व शेतकरी शेतमजुर व ग्रामस्थ एकत्र येऊन शासनाच्या या सापत्न भाव वागणूकीविरूद्ध तिव्र आंदोलन छेडतील असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या धरणे आंदोलनात अर्जुन कोकाटे, पुंजाराम काळे, भाऊसाहेब जगताप, बाबासाहेब कोकाटे, सुखदेव काळे, कचरू आहेर ,भाऊसाहेब कोकाटे, जालिंदर कोकाटे, शरद काळे, अमोल सोनवणे, तुषार सोनवणे, दशरथ जाधव, बबन काळे, रामदास कोकाटे, दत्तु काळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
 

Web Title:  17 villages, including Satali, are demanded to be included in the drought-hit list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.