लग्नाला नकार दिल्याने १७ वर्षांच्या प्रेयसीने उचलले टोकाचे पाऊल; प्रियकराच्या हाती बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 13:04 IST2025-03-31T13:01:22+5:302025-03-31T13:04:06+5:30

Nashik Suicide Case : प्रियकराने लग्नाचे आश्वासन देत प्रेमाच्या अणाभाका घेतल्या. मात्र, नंतर दगाफटका करत लग्नाला नकार देत दुसऱ्या ...

17-year-old girlfriend takes extreme step after refusing marriage; hands handcuffs to boyfriend | लग्नाला नकार दिल्याने १७ वर्षांच्या प्रेयसीने उचलले टोकाचे पाऊल; प्रियकराच्या हाती बेड्या

लग्नाला नकार दिल्याने १७ वर्षांच्या प्रेयसीने उचलले टोकाचे पाऊल; प्रियकराच्या हाती बेड्या

Nashik Suicide Case : प्रियकराने लग्नाचे आश्वासन देत प्रेमाच्या अणाभाका घेतल्या. मात्र, नंतर दगाफटका करत लग्नाला नकार देत दुसऱ्या एका प्रेयसीसमोर मारहाण केल्याचा राग मनात धरत एका अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना नाशिक शहरातील बेथेलनगर इथं घडली. अॅश्ली साठे असं मृत झालेल्या १७ वर्षीय मुलीचं नाव आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संशयित वेदांत पाटील याला शनिवारी ताब्यात घेतलं आहे.

फिर्यादी मनीषा भालेराव यांच्याकडे अॅश्ली ही लहानपणापासून राहत होती. भालेराव यांची ती भाची असून, मागील वर्षभरापासून वेदांतसोबत तिची ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमात झाल्याने दोघेही सोबत फिरायला जात होते. ही बाब मयताची मावशी भालेराव यांनाही माहीत होती. यामुळे त्यांनी वेदांतकडे विचारणा केली असता त्याने 'आम्ही दोघे लग्न करणार आहोत,' असे सांगितले होते. त्यानंतर अॅश्लीच्या आईने वयाची अठरा वर्षे पूर्ण होताच लग्न करून देऊ, तोपर्यत एकमेकांना भेटणे बंद करा, अशी समज दिली होती.

दोघांमध्ये सुरू होते भांडण
मागील तीन ते चार दिवसांपासून या दोघांमध्ये भांडण सुरू होते. यामुळे अॅश्ली हिने तिच्या मावशीकडे तक्रार करत वेदांत याचे दुसऱ्या मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरू असून, त्याने तिच्यासमोर मला मारहाण केल्याचे सांगितले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या तणावातून शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली.

Web Title: 17-year-old girlfriend takes extreme step after refusing marriage; hands handcuffs to boyfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.