कळवण तालुक्यात १७१ प्रतिबंधित क्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:12 AM2021-04-05T04:12:48+5:302021-04-05T04:12:48+5:30

कोरोना चाचणीची होणारी वाढ, मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, लग्नकार्य, इतर सामाजिक कार्यक्रम व अंत्यविधीसाठी होणाऱ्या ...

171 restricted areas in Kalvan taluka | कळवण तालुक्यात १७१ प्रतिबंधित क्षेत्र

कळवण तालुक्यात १७१ प्रतिबंधित क्षेत्र

Next

कोरोना चाचणीची होणारी वाढ, मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, लग्नकार्य, इतर सामाजिक कार्यक्रम व अंत्यविधीसाठी होणाऱ्या गर्दीमुळे तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कळवण तालुक्यात १७१ ठिकाणचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून, तेथे पथके तयार करून तैनात करण्यात आली आहेत. शिवाय रुग्ण वाढत असल्यामुळे राज्य शासनाने स्वतंत्र यंत्रणा तयार केली असून, या यंत्रणेत नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी, आरोग्यसेवक, सेविका, शिक्षक, आशासेविका, तलाठी, ग्रामसेवक आदींचा समावेश आहे.

कळवण तालुक्यात आजमितीस ३९३ रुग्ण ॲक्टिव्ह असून, कळवण नगरपंचायत हद्दीत १३८ जण ॲक्टिव्ह आहेत. कळवण शहरात ३२ प्रतिबंधित क्षेत्र असून, तालुक्यात तब्बल १७१ ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेे. सप्तशृंगगड, अभोणा व नवी बेज येथे बंदचा निर्णय स्थानिक यंत्रणेने घेतला आहे. तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे लसीकरण सुरू आहे. मानूर येथे कोविड केअर सेंटर तर अभोणा येथे डेडीकेटेड कोविड सेंटर कार्यरत आहे. तालुक्यात गावपातळीवर व कळवण शहरात स्वच्छता मोहीम हाती घेऊन जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे.

तालुक्यात आतापर्यंत ११४९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, आज त्यात १९ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. कळवण नगरपंचायत हद्दीत ५१८ कोरोनाबाधित आढळून आले असून, तालुक्याच्या ग्रामीण व आदिवासी भागात ६२१ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आजमितीस मानूर कोविड केअर सेंटरमध्ये ३५ रुग्ण ॲक्टिव्ह असून, अभोणा येथील डेडीकेट कोविड सेंटरमध्ये २८ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. ३३० कोरोनाबाधित रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे कोरोना आजार बरा होत असून, मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण बरे होत आहेत. तालुक्यात सध्या ३९३ बाधित रुग्ण असून, १७७ स्वॅब प्रलंबित असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर पाटील यांनी दिली.

कळवण पोलीस स्टेशनअंतर्गत ३०० व्यक्तींवर कोरोना संसर्ग नियमांचे पालन केले नाही म्हणून कारवाई करण्यात आली आहे. नियमांचे पालन केले नाही नागरिकांकडून कळवण पोलिसांनी २० हजार रुपयाचा दंड वसूल करून दंडात्मक कारवाई केली. मास्क वापरला नाही, नियमांचे पालन केले म्हणून नागरिकांना २०० रुपये दंड केला तरी त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा फरक पडत नसल्याने कळवण पोलिसांनी कठोर पाऊले उचलत नवी बेज व सप्तशृंगगडावर कर्फ्यू असताना नियमांचे पालन केले नाही म्हणून १३ व्यक्तींवर १८८ प्रमाणे कायदेशीर कारवाई करून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्याची कारवाई पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी केली.

अभोणा शहरात कोरोनाबाधितांची दिवसेंदिवस संख्या वाढत असल्यामुळे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला तरी शासनाच्या कोरोना नियमांचे उल्लंघन करण्यात नागरिकांनी धन्यता मानली. अभोणा पोलिसांनी कठोर निर्णय घेऊन वेगवेगळ्या कलमाखाली १७७ व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई अभोणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के यांनी केली असून, नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींकडून ६५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.

===Photopath===

040421\04nsk_32_04042021_13.jpg

===Caption===

कळवण येथे प्रतिबंधित क्षेत्रात करण्यात आलेली ब्रवेश बंद.ी

Web Title: 171 restricted areas in Kalvan taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.