जिल्ह्यात १७५ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:26 AM2021-02-06T04:26:37+5:302021-02-06T04:26:37+5:30
नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ५) एकूण १७५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, १५६ रुग्ण नव्याने बाधित झाले ...
नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ५) एकूण १७५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, १५६ रुग्ण नव्याने बाधित झाले आहेत. दरम्यान, नाशिक मनपा क्षेत्रात एकाचा मृत्यू झाला असल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या २०५५ वर पोहोचली आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १६ हजार ५४० वर पोहोचली असून, त्यातील १ लाख १३ हजार २९९ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर ११८६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९७.२२ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९७.९१, नाशिक ग्रामीण ९६.३१, मालेगाव शहरात ९३.१२, तर जिल्हाबाह्य ९४.९८ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या ५ लाख ५ हजार ५१० असून, त्यातील ३ लाख ८८ हजार १९० रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख १६ हजार ५४० रुग्ण बाधित आढळून आले असून, ६३१ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.