जिल्ह्यातील १७५८ रुग्ण रुग्णालयातून घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 01:07 AM2020-09-27T01:07:16+5:302020-09-27T01:08:50+5:30
जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून, त्या तुलनेत नवीन दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी असल्याने आरोग्य विभागाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
नाशिक : जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून, त्या तुलनेत नवीन दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी असल्याने आरोग्य विभागाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
शनिवारी नाशिक जिल्ह्यातील १७५८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर १४२४ रुग्ण जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत ७१ हजार ७२१ रुग्ण पॉझिटिव्ह झाले असून, त्यातील ६३ हजार ०९७ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सध्या ७३२९ असून आतापर्यंत एकूण १२९५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यात नाशिक महानगरपालिका हद्दीतील ६६२, नाशिक ग्रामीण हद्दीतील ७०४ मालेगाव महापालिका हद्दीतील १५१, नाशिक ग्रामीणला ४१२, तर जिल्हा बाह्य २८ रुग्णांचा त्यात समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील २० रुग्णांचा शनिवारी मृत्यू झाला असून, त्यातील १० रुग्ण नाशिक शहरातील तर ग्रामीणमध्ये १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांची संख्या ७१ हजार ७२१ तर अहवाल प्रलंबित असलेल्या रुग्णांची संख्या १७१९ आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ५३ हजार १७३ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, त्यातील एक लाख ७९ हजार ६६१ इतके रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी ३५०० रुग्ण हे नाशिक महानगरपालिका रुग्णालयांमध्ये तसेच गृहविलगीकरण आहेत. ३२०१ रुग्ण हे मालेगावच्या महानगरपालिका रुग्णालयांमध्ये तर ५१७ रुग्ण हे मालेगावला असून, जिल्हाबाह्य १११ रुग्ण दाखल झाले आहेत.