पिंपळगावला दोन दिवसात १८ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 09:41 PM2020-07-21T21:41:48+5:302020-07-22T01:01:00+5:30
पिंपळगाव बसवंत : शहरातील शिवाजीनगर व परिसरातील रानमळा येथे रविवारी उशीरा प्राप्त झालेल्या अहवालात ९ रु ग्ण बाधित असल्याचा अहवाल मिळाला. त्यापाठोपाठ दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि. २१) पुन्हा त्यात ९ रु ग्णांची भर पडली असून यात चार वर्षीय बालिकेचाही समावेश आहे. शहरात दोन दिवसात अठरा रु ग्णांची वाढ होऊन कोरोना बाधितांची संख्या ७९ वर पोहचल्याने श्हरवासियांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

पिंपळगाव शहरातील राजवाडा परिसरातील बाधित व्यक्तीच्या संपर्कातील कुटुंबातील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात २३, ५०, ५५ वर्षाच्या महिलांसह ५५ वर्षीय पुरुष व ४ वर्षाच्या बालिकेचा समावेश आहे.
याशिवाय शहरातील चिंचखेडरोड परिसरातील बाधित व्यक्तीच्या कुटुंबातील ५० वर्षीय व्यक्तीसह ४८ व ५७ वर्षीय महिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. याच परिसरातील ५३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. कुटुंबातील सदस्यांना क्वारण्टाईन करणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. मात्र शहरातील कोरोना बधितांची संख्या ७९ वर पोहचल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने प्रशासनाने वेळीच कठोर निर्णय घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.