देवळाली, लॅमरोड भागात बसविले १८ सीसीटीव्ही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:47 AM2019-07-22T00:47:43+5:302019-07-22T00:48:21+5:30
गेले काही दिवस घडत असलेल्या अनेक गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगार शोधण्यास मदत होत आहे. देवळालीमध्ये लॅमरोड सुरक्षित राहण्यासाठी लावलेले १८ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे़
देवळाली कॅम्प : गेले काही दिवस घडत असलेल्या अनेक गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगार शोधण्यास मदत होत आहे. देवळालीमध्ये लॅमरोड सुरक्षित राहण्यासाठी लावलेले १८ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे़
देवळालीच्या वॉर्ड क्र. ४ मध्ये लामरोडवर तब्बल १८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून, त्यांचे लोकार्पण पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर शिवसेना उपनेते बबनराव घोलप, पोलीस निरीक्षक देवीदास वांजळे, प्रकाश म्हस्के, युवराज गोडसे, प्राचार्य डॉ. विजय मेधने, नगरसेविका आशा गोडसे, यास्मिन नाथानी, तानाजी भोर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव खताळे, सीताराम मुळाणे, सुरेश शेटे, दशरथ गोडसे आदी उपस्थित होते. शिवसेना तालुका संघटक चंद्रकांत गोडसे यांच्या पुढाकारातून हे कॅमेरे बसविण्यात आले आहे़ यावेळी रिमोटचे बटन दाबून क्लोज सर्किट सुरू करण्यात आले. सूत्रसंचालन विक्रम गोडसे तर आभार चंद्रकांत गोडसे यांनी व्यक्त केले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़