धोंडवीरनगरला १८ कुटुंब सहा महिन्यांपासून अंधारात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 09:22 PM2020-07-04T21:22:29+5:302020-07-04T23:26:16+5:30
सिन्नर : तालुक्यातील धोंडवीरनगर शिवारात वास्तव्यास असलेले १८ कुटुंब गुरेवाडी शिवारातील विद्युत रोहित्र नादुरुस्त झाल्याने गेल्या सहा महिन्यांपासून अंधारात असून, यासंदर्भात महावितरण कंपनीकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सिन्नर : तालुक्यातील धोंडवीरनगर शिवारात वास्तव्यास असलेले १८ कुटुंब गुरेवाडी शिवारातील विद्युत रोहित्र नादुरुस्त झाल्याने गेल्या सहा महिन्यांपासून अंधारात असून, यासंदर्भात महावितरण कंपनीकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त करण्यात येत आहे.
धोंडवीरनगर शिवारातील स्वानंद आश्रम परिसरातील गुरेवाडीच्या थ्री फेज रोहित्र असणारे अठरा कुटुंब मीटरधारक असून, नियमित वीजबिल भरणारे आहेत. सहा महिन्यांपूर्वी गुरेवाडी परिसरातील रोहित्र नादुरुस्त झाल्याने या अठरा कुटुंबांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात महावितरण कंपनीकडे वारंवार मागणी करूनही नवीन रोहित्र देण्यास टाळाटाळ केली जात असून, नवीनसाठी डीपीडीसीकडे प्रस्ताव सादर केला असून, तो अद्याप मंजूर नाही. मंजूर झाल्यानंतर ट्रान्स्फार्मर बदलून देऊ अशी उत्तरे या वीजग्राहकांना दिली जात आहे.
ग्रामस्थांच्या तक्रारीची अद्याप दखल घेतली गेली नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस आहे थ्री फेज ट्रान्स्फॉर्मर सिंगल फेज करण्यासाठी अडचणीचं होत आहे. बिल भरूनही लाइट मिळत नाही अशी परिस्थिती आठरा घरातील नागरिकांची झाली आहे.
या प्रश्नी आमदार माणिकराव कोकाटे यांनी लक्ष घालून विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांन त्वरित रोहित्र देण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी सरपंच सुनीता सुभाष शिंदे यांच्यासह अमोल शिंदे, कुशाबा शिंदे, सुभाष शिंदे, मधुकर शिंदे, रंगनाथ शिंदे, लहू शिंदे, वाळीबा सोनवणे, बिस्तराम सोनवणे, चंद्रभान खुळे, संजय सिरसाट, अर्जुन गांडोळे, शांताराम गांडोळे, तुषार गांडोळे, स्वानंद पंढरीनाथ महाराज आश्रम, फादर फ्रान्सिस शिक्षण संस्था, एकनाथ सोनवणे, अशोक गांडोळे, आदींनी केली आहे.