सायखेड्याला १८ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2022 01:57 AM2022-04-29T01:57:37+5:302022-04-29T01:57:53+5:30
सायखेडा येथील गोदावरी नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या एका १८ वर्षीय युवकाचा गुरुवार रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पाण्यात बुडून मृत्यू झाला.
सायखेडा : येथील गोदावरी नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या एका १८ वर्षीय युवकाचा गुरुवार रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पाण्यात बुडून मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील गोदावरी नदीपात्रामध्ये पोहण्यासाठी गेलेला जावेद शकील अत्तार (१८) यास पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. ही माहिती मनोज कापडी यांनी आपत्ती व्यवस्थापन समिती, चांदोरीचे अध्यक्ष सागर गडाख यांना कळवली. त्यानंतर फकिरा धुळे, बाळू आंबेकर, केशव किरण वाघ, शंकर डोंगरे, किशोर ससाने, संकेत घुगे, अरुण दराडे यांच्या पथकाने शोधकार्य सुरू केले. त्यानंतर तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी करीत आहेत.