१८० जप्ती वॉरंट; ६० नळजोडण्या खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 01:47 AM2019-03-18T01:47:07+5:302019-03-18T01:48:13+5:30

महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची मोहीम हाती घेण्यात आली असून, महापालिकेचा महसूल बुडविणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध कारवाईला प्रारंभ करण्यात आला आहे. या मोहिमेदरम्यान सुमारे १८० नागरिकांना जप्ती वॉरंट बजावण्यात आले असून, ६० नागरिकांच्या नळजोडण्या खंडित करण्यात आलेल्या आहेत.

180 confession warrant; 60 relapses break | १८० जप्ती वॉरंट; ६० नळजोडण्या खंडित

१८० जप्ती वॉरंट; ६० नळजोडण्या खंडित

Next
ठळक मुद्देपंचवटी विभाग : घरपट्टी, पाणीपट्टी मिळून २२ कोटींची वसुली

पंचवटी : महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची मोहीम हाती घेण्यात आली असून, महापालिकेचा महसूल बुडविणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध कारवाईला प्रारंभ करण्यात आला आहे. या मोहिमेदरम्यान सुमारे १८० नागरिकांना जप्ती वॉरंट बजावण्यात आले असून, ६० नागरिकांच्या नळजोडण्या खंडित करण्यात आलेल्या आहेत. जप्ती नोटीस बजावल्यापासून २१ दिवसांत थकीत महसूल भरला नाही तर जप्त मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
१ एप्रिल २०१८ ते १६ मार्च २०१९ या साडेअकरा महिन्यांच्या कालावधीत घरपट्टी व पाणीपट्टी मिळून सुमारे २२ कोटी रु पये वसुली करण्यात आली आहे. गेल्यावर्षी घरपट्टी व पाणीपट्टी मिळून १९ कोटी रु पयांचा महसूल वसूल करण्यात आला होता. यंदाच्या ३ कोटी रुपयांनी महसुलात वाढ झाली आहे. पंचवटी परिसरात जवळपास ९० हजार मिळकतधारक आहे. सर्वांना महापालिका प्रशासनाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी देयक वाटप करण्यात आले असून, त्यानुसार मनपा पंचवटी विभागीय अधिकारी आर. आर. गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी विभागात वसुलीची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
साडेअकरा महिन्यांच्या कालावधीत पाणीपट्टीची ५ कोटी ८० लाख २६ हजार ४६५, तर १५ कोटी ४२ लाख ५३ हजार २३६ इतकी घरपट्टीची रक्कम वसूल करण्यात आली आहे. गेल्या २०१७ ते २०१८ या वर्षात पाणीपट्टी व घरपट्टी मिळून सुमारे १९ कोटी रु पयांची वसुली करण्यात आली होती. यंदा २२ कोटी रु पयांची वसुली झाल्याने अंदाजे ३ कोटींनी महसूल वाढला आहे. महापालिकेच्या पंचवटी विभागाच्या वतीने कर थकबाकीदारांना जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आलेल्या असून, नोटीस बजावल्यानंतर संबंधित थकबाकीदारांनी कर न भरल्यास जप्त मालमत्तेचा जाहीर लिलाव केला जाणार आहे. त्यामुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे़

Web Title: 180 confession warrant; 60 relapses break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.