जिल्ह्यात १८१ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:12 AM2021-01-15T04:12:50+5:302021-01-15T04:12:50+5:30
नाशिक : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत बुधवारी (दि. १३) अजून २०५ रुग्णांची भर पडली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ...
नाशिक : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत बुधवारी (दि. १३) अजून २०५ रुग्णांची भर पडली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या १८१ एवढी आहे. दरम्यान, कोराेनाने नाशिक शहरात दोघांचा मृत्यू झाला असून बळींची एकूण संख्या २,०१८ वर पोहोचली आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १२ हजार ९९४ वर पोहोचली असून त्यातील १ लाख ९ हजार ५४६ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर १९२२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९६.९५ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९७.४५, नाशिक ग्रामीण ९६.४२, मालेगाव शहरात ९३.१५, तर जिल्हाबाह्य ९४.८४ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या ४ लाख ६२ हजार १९४ असून त्यातील ३ लाख ४७ हजार २७८ रुग्ण निगेटिव्ह तर १ लाख १२ हजार ९९४ रुग्ण बाधित आढळून आले असून १ हजार ९२२ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.