जिल्ह्यात १८३ नवीन बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 01:49 AM2021-07-05T01:49:29+5:302021-07-05T01:50:34+5:30
जिल्ह्यात रविवारी १८३ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, २८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, दिवसभरात एकूण सात नागरिकांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ८३७८वर पोहोचली आहे.
नाशिक : जिल्ह्यात रविवारी १८३ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, २८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, दिवसभरात एकूण सात नागरिकांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ८३७८वर पोहोचली आहे.
जिल्ह्यातील नवीन बाधितांची संख्या रविवारीदेखील दोनशेच्या जवळपास राहिली आहे. कोरोनामुक्तांची संख्या नवीन बाधितांच्या तुलनेत शंभरहून अधिक आहे, हीच त्या मानाने काहीशी दिलासादायक बाब आहे. मात्र, नवीन बाधितांची संख्या शे-सव्वाशेवरून सलग दुसऱ्या दिवशी अधिक राहणे नागरिकांच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरू शकते. दरम्यान, जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २१६४ वर आली असून, जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांची संख्यादेखील घटून ४०७ वर आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात गेलेल्या सात बळींमध्ये पाच नाशिक ग्रामीणचे, तर दोन नाशिक मनपा क्षेत्रातील आहेत. जिल्ह्यातील रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ९७.३३ टक्क्यांवर पोहोचले आहे.