सीए परीक्षेत १८३ विद्यार्थी उत्तीर्ण

By Admin | Published: July 19, 2016 01:20 AM2016-07-19T01:20:35+5:302016-07-19T01:24:46+5:30

निकाल : पहिल्या प्रयत्नात ३२ जणांना यश

183 students passed the CA examination | सीए परीक्षेत १८३ विद्यार्थी उत्तीर्ण

सीए परीक्षेत १८३ विद्यार्थी उत्तीर्ण

googlenewsNext

नाशिक : दि इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट्स आॅफ इंडिया (आयसीएआय)कडून सोमवारी
(दि. १८) सीएच्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, नाशिकमधून ३२ विद्यार्थी पहिल्याच प्रयत्नात दोन्ही समूहात उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत एकूण १८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यापैकी पहिल्या समूहात ७१, तर दुसऱ्या समूहात ८० जण उत्तीर्ण झाले आहेत. सीपीटी परीक्षेत एकूण ३१६ विद्यार्थ्यांना यश लाभले.
उपलब्ध माहितीनुसार, सनदी लेखापालासाठीच्या अंतिम परीक्षेत शुभम शाह याने पहिल्या प्रयत्नात ८०० पैकी ५०० गुण प्राप्त केले. पूर्वा अगिवाल (४८१), सर्वेश भट्टड (४७४), केतकी निकुंभ (४७०), देवेश भट्टड (४४६), श्रृतिका संगमनेरकर (४३८) श्रद्धांजली महेंद्रकुमार सिंघानिया (४२२), कुणाल कुचेरिया (४२०), हर्षदा नावंदर (४१६), राधिका कचोलिया (४१०), अन्विता आचार्य, सुजय ढेरिंगे, किरण दीपक थोरात, सायली खरे, आदित्य मणेकर, अक्षय कणीकर, हर्षल अग्रवाल, अजय माउलीकर, सौरव घन, प्राजक्ता कुलकर्णी, दर्शन लढ्ढा, रशीदा सुनेलवाला, मयूर कोठावदे, विवेक कलंत्री, उर्वशी वर्मा, समीर कुलकर्णी, भाग्यश्री नहार, गुणवंत राठी, विशाल झंवर, कोमल नेवाल, देवांश संघवी, अबोली पाटील, श्रेया ओस्तवाल आदिंनी पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले. संयमी सामसुका पहिला समूह दुसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण झाली असून, सुमारे १८३ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळविले आहे.
दरम्यान, सनदी लेखापाल होण्यासाठी या परीक्षेकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत असून, या परीक्षांचा निकालही दिवसेंदिवस वाढत असल्याचे आयसीएआय, नाशिक शाखेचे व्यवस्थापक योगेश कातकडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 183 students passed the CA examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.