अवघ्या पाच दिवसांत तब्बल १८४४ बाधित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:18 AM2021-02-27T04:18:54+5:302021-02-27T04:18:54+5:30

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधित संख्येने वेग पकडला असून, शुक्रवारी (दि. २८) नवीन कोरोना रुग्णसंख्येने पुन्हा ३२४ चा आकडा ...

1844 interrupted in just five days! | अवघ्या पाच दिवसांत तब्बल १८४४ बाधित !

अवघ्या पाच दिवसांत तब्बल १८४४ बाधित !

Next

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधित संख्येने वेग पकडला असून, शुक्रवारी (दि. २८) नवीन कोरोना रुग्णसंख्येने पुन्हा ३२४ चा आकडा गाठला. गत पाच दिवसांत कोरोनाचे तब्बल १८४४ रुग्ण आढळून आल्याने फेब्रुवारीचा अखेरचा आठवडा नाशिककरांना चिंतेत टाकणारा ठरला आहे. आठवडाअखेरपर्यंत बाधितसंख्या सातत्याने चढी राहिल्यास कठोर पर्यायांची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसभरात तब्बल ६०१ ने भर पडली होती, तर शुक्रवारी नवीन ३२४ रुग्ण बाधित आणि २३१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. मालेगाव मनपा क्षेत्रात दोन आणि जिल्हाबाह्य १ अशा ३ मृत्यूंमुळे एकूण मृतांची संख्या २०९८ झाली आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख २१ हजार ८०२ वर पोहोचली असून, त्यातील एक लाख १७ हजार १४५ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. २५५९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९६.१८ आहे. त्यात नाशिक शहरात ९६.४२, नाशिक ग्रामीण ९६.१८, मालेगाव शहरात ९२.८५, तर जिल्हाबाह्य ९३.७९ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या पाच लाख ३८ हजार ७०९ असून, त्यातील चार लाख १५ हजार ६५९ रुग्ण निगेटिव्ह, तर एक लाख २१ हजार ८०२ रुग्ण बाधित आढळून आले असून, १२४८ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.

इन्फो

अल्पावधीत दीड हजारांनी रुग्णवाढ

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळण्याचे प्रमाण ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात होते. बाधितांचा आकडा ६०० पार पोहोचण्याची स्थिती यापूर्वी २० ते २८ सप्टेंबरदरम्यान होती. त्यानंतर थेट गुरुवारीच इतक्या मोठ्या बाधित संख्येची नोंद झाली आहे. त्यामुळेच फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात बाधित संख्या केवळ ११०० नजीक पोहोचली असताना फेब्रुवारीअखेरपर्यंत सध्याची बाधितसंख्या अडीच हजाराचा टप्पा ओलांडून २५५९ वर पोहोचली आहे.

फोटो -ग्राफ

पेजेस/ २६ग्राफ

( ग्राफमधील अखेरचा ग्राफ बदलून घ्यायचा आहे. सपकाळे यांच्याशी बोलून घ्यावे. २६ फेब्रुवारीला बाधित संख्या ३२४ आहे. सपकाळे यांनी तो आकडा टेम्पररी दिला होता.)

Web Title: 1844 interrupted in just five days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.