पांगरी विकास संस्थेच्या १२ जागांसाठी १९ उमेदवार
By admin | Published: March 13, 2016 10:26 PM2016-03-13T22:26:20+5:302016-03-13T22:41:11+5:30
पांगरी विकास संस्थेच्या १२ जागांसाठी १९ उमेदवार
पांगरी : सिन्नर तालुक्यातील्य पांगरी बुद्रुक येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या १२ जागांसाठी दि.२७ मार्च रोजी मतदान होणार आहे. संचालक मंडळाच्या १२ जागांसाठी १९ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सोमवारी (दि. १४) चिन्ह वाटप करण्यात येणार आहे.
यासाठक्ष ३० इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. माघारीच्या निर्धारित वेळेत ११ जणांनी माघार घेतल्याने संचालक मंडळाच्या १२ जागांसाठी १९ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. भटक्या विमुक्त जातीच्या जागेसाठी प्रशांत प्रल्हाद धुमाळ यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. सर्वसाधारण कर्जदार गटाच्या आठ जागांसाठी विलास नामदेव पांगारकर, प्रकाश भागवत पांगारकर, रमेश कचरू पांगारकर, विश्वनाथ पोपट पगार, शांताराम श्रीपत पगार, रंभाजी पाराजी पगार, भाऊसाहेब वामन पगार, इंद्रभान नरहरी पगार, मधुकर संतराम पगार, कैलास पंढरीनाथ शिंदे, चंद्रभान दामोधर वाळुंज, संजय सदाशिव वारुळे, बाजीराव छबू कांडेकर हे उमेदवार रिंगणात आहेत. (वार्ताहर)