‘त्या’ महिलेच्या घरात सापडले १९ लाख; मायलेकांना बुधवारपर्यंत कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 06:56 AM2023-11-21T06:56:14+5:302023-11-21T06:56:44+5:30
मायलेकांना बुधवारपर्यंत कोठडी; मोबाइल डेटाचे तांत्रिक विश्लेषण सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : एक कोटीच्या खंडणीप्रकरणात रंगेहात सापडलेल्या निफाड येथील बीजगुणन केंद्रात कृषी सहायक असलेली सारिका सोनवणेच्या घरातून १९ लाखांच्या रोख रुपयांचे घबाड हाती लागले आहे.
दिंडोरीप्रणीत स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्राच्या विश्वस्त मंडळातील कार्यकारी सदस्य निंबा मोतीराम शिरसाट यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याचे सांगून वेळोवेळी ‘ब्लॅकमेल’ करून सुमारे एक कोटी रुपयांची खंडणी संशयित मायलेकांनी उकळल्याचे समोर आले आहे.
गंगापूर पोलिसांनी संशयित महिला कृषी सहायक सारिका सोनवणे (४२), मोहित सोनवणे (२५) या दोघांना अटक केली. येत्या बुधवारपर्यंत न्यायालयाने मायलेकाला पोलिस कोठडी सुनावली आहे.
सारिका सोनवणेच्या मोबाइल डेटाचेही तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे. आक्षेपार्ह तो व्हिडीओ फॉरेन्सिकच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
आक्षेपार्ह व्हिडीओ ‘फॉरेन्सिक’कडे
nमायलेकाकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे पोलिस तपासाला गती देण्याचा प्रयत्न करत आहेत. दोघांच्या आर्थिक व्यवहारांची छाननीही पोलिस करत आहेत.
nज्या आक्षेपार्ह अश्लील व्हिडीओचा आधार घेत सुमारे एक कोटी पाच लाखांची खंडणी वसूल केली, तो व्हिडीओ फॉरेन्सिककडे तपासाकरिता पोलिसांनी सोपविला आहे.
nत्या व्हिडीओची सत्यता पोलिस पडताळून बघत आहेत. संशयित महिलेच्या मोबाइलमधील डेटाची पडताळणी करण्यात येत पोलिस प्रशासन करत आहेत.