म्युकरमायकोसिसने जिल्ह्यात १९ रूग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:12 AM2021-05-28T04:12:01+5:302021-05-28T04:12:01+5:30
म्युकरमायकोसिसच्या रूग्णांची दिवसागणिक वाढत असलेल्या संख्येमुळे आरोग्य विभाग चिंतेत सापडला असून, पहिल्या आठवड्यात १७१ संख्या असलेल्या रूग्णांची संख्या अवघ्या ...
म्युकरमायकोसिसच्या रूग्णांची दिवसागणिक वाढत असलेल्या संख्येमुळे आरोग्य विभाग चिंतेत सापडला असून, पहिल्या आठवड्यात १७१ संख्या असलेल्या रूग्णांची संख्या अवघ्या चार दिवसांतच २२२ वर पोहोचली आहे. या आजारावर गुणकारी मानले जाणारे ॲम्फोटेरिसिन-बी या औषधांचा ही पुरेसा साठा रूग्णांसाठी होत नसल्याने त्यामुळेही रूग्णांवर उपचारासाठी अडचणी येत आहेत. गेल्या दहा दिवसात १९ रूग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर वैद्यकीय विभागाने आपल्या प्रयत्नांतून जवळपास १८५ रूग्णांवर शस्त्रक्रिया केली आहे. त्यातून बरे होऊन घरी जाणाऱ्यांचे प्रमाण मात्र ४९ इतकेच आहे.
चौकट===
ग्रामीण भागात मृत्यूचे प्रमाण अधिक
म्युकरमायकोसिसच्या रूग्णांचे प्रमाण जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर आढळून आले असून, जिल्ह्यात मालेगावला ग्रामीण हॉस्पिटल वगळता अन्यत्र उपचाराची सोय नाही. त्यामुळे बहुतांशी रूग्ण आडगावच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. या महाविद्यालयात ९ तर मालेगावी ४ रूग्ण दगावले असून, जिल्हा रूग्णालयातही एका रूग्णाचा बळी गेला आहे.