बंद  फ्लॅटला १९ हजारांचे बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 11:19 PM2020-06-29T23:19:24+5:302020-06-29T23:19:47+5:30

नाशिक : संगणकीयप्रणाली असल्याने वीजबिलात कोणतीही चूक होत नसल्याने ग्राहकांचे वीज बिल हे बरोबरच असल्याचा दावा करणाऱ्या महावितरणने तीन महिने बंद घराचे वीज बिल चक्क १९ हजार रुपये इतके पाठविल्याची बाब उघडकीस आली आहे. वीज बिल भरावेच लागेल, असा पवित्रा महावितरणचे अभियंते घेत असल्याने शंकेचे निरसन करण्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.

19 thousand bill for closed flat | बंद  फ्लॅटला १९ हजारांचे बिल

बंद  फ्लॅटला १९ हजारांचे बिल

Next
ठळक मुद्देअजब कारभार : लॉकडाऊनमध्ये बंद असलेल्या घरांना वीज आकारणी; महावितरणचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : संगणकीयप्रणाली असल्याने वीजबिलात कोणतीही चूक होत नसल्याने ग्राहकांचे वीज बिल हे बरोबरच असल्याचा दावा करणाऱ्या महावितरणने तीन महिने बंद घराचे वीज बिल चक्क १९ हजार रुपये इतके पाठविल्याची बाब उघडकीस आली आहे. वीज बिल भरावेच लागेल, असा पवित्रा महावितरणचे अभियंते घेत असल्याने शंकेचे निरसन करण्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.
चुकीचे आणि जादा वीज बिल आल्याची तक्रार सर्व ग्राहकांकडून होत असतानाही ग्राहकांच्या तक्रारीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. आलेले वीज बिल हे बरोबरच असल्याची भूमिका घेत महावितरणच्या प्रत्येक अधिकाऱ्यांनी ग्राहकांना आकड्याच्या घोळात अडकविण्याचे धोरण अवलंबिले असल्याचे या प्रकरणावरूनही समोर आले आहे.
गंगापूररोडवरील रहिवासी बाळासाहेब कोल्हे यांच्या एका फ्लॅटमध्ये राहणारी मुले लॉकडाऊनमुळे आपापल्या गावी परतली असल्याने गेल्या तीन महिन्यांपासून फ्लॅॅट बंद आहे. मात्र या फ्लॅटचे तीन महिन्यांचे वीज बिल १९,७४० इतके देण्यात आले आहे. ज्या घरात विजेचा एकही बल्ब सुरू नाही अशा ठिकाणचे मीटर रिडिंग अचूक कसे असू शकते? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरमहा दीड ते दोन हजार वीज बिल येणाºया या फ्लॅटधारकाला १९ हजारांचे बिल देण्यात आल्याने तेही अचंबित झाले आहेत. दुसºया ग्राहकाला वीज बिल १४,१३० रुपयेपंचवटीतील हनुमानवाडी येथील विकास जाधव या ग्राहकालाही असाच काहीसा अनुभव आला आहे. दरमहा बाराशे ते दीड हजार इतके वीजबिल येत असताना लॉकडाऊनचे वीजबिल १४,१३० इतके वीजबिल पाठविण्यात आले आहे. आता महावितरण बिल भरण्यासाठी आग्रह करीत असून, तक्रार ऐकूनही घेतली जात नसल्याचा अनुभव जाधव यांना येत आहे.प्लॅट बंद असतानाही १९ हजारांचे वीज बिल कसे आले याचेच आश्चर्य वाटते. महावितरणकडून समाधान होऊ शकलेले नाही. त्यामुळे महावितरणच्या विरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार करणार आहे.
- बाळासाहेब कोल्हे,
थत्तेनगर, गंगापूररोडग्राहकांचे समाधान करण्याची जबाबदारी असताना केवळ तांत्रिक मुद्दे सांगून ग्राहकांच्या माथी बिल मारले जात आहे. दरमहा येणाºया बिलाच्या तीनपट वीज बिल संशय निर्माण करणारे आहे.
- विकास जाधव,
हनुमानवाडी, पंचवटी

Web Title: 19 thousand bill for closed flat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.