जिल्ह्यात १९० कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:13 AM2021-01-18T04:13:57+5:302021-01-18T04:13:57+5:30

नाशिक : जिल्ह्यात रविवारी (दि. १७) एकूण १९० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून १२८ रुग्ण नव्याने बाधित झाले आहेत. दरम्यान ...

190 corona free in the district | जिल्ह्यात १९० कोरोनामुक्त

जिल्ह्यात १९० कोरोनामुक्त

Next

नाशिक : जिल्ह्यात रविवारी (दि. १७) एकूण १९० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून १२८ रुग्ण नव्याने बाधित झाले आहेत. दरम्यान काल मालेगाव मनपा क्षेत्रात केवळ एकमेव मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील बळींची संख्या २०२९ वर पोहोचली आहे.

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १३ हजार ६८६ वर पोहोचली असून त्यातील १ लाख १० हजार ३४२ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर १३१५ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९७.०६ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९७.५७, नाशिक ग्रामीण ९६.५१, मालेगाव शहरात ९३.२४, तर जिल्हाबाह्य ९५.१६ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या ४ लाख ६९ हजार १९९ असून त्यातील ३ लाख ५४ हजार ४३७ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख १३ हजार ६८६ रुग्ण बाधित आढळून आले असून १०७६ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.

Web Title: 190 corona free in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.