१९००किलो मांस जप्त; आठ जनावरांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:13 AM2021-01-18T04:13:44+5:302021-01-18T04:13:44+5:30
ओझरमधील चांदणी चौकात गोवंश जातीचे जनावरे एका पिकअप जीपमध्ये डांबून कत्तलीच्या उद्देशाने त्यांची वाहतुक केली जाणार असल्याची गोपनीय माहिती ...
ओझरमधील चांदणी चौकात गोवंश जातीचे जनावरे एका पिकअप जीपमध्ये डांबून कत्तलीच्या उद्देशाने त्यांची वाहतुक केली जाणार असल्याची गोपनीय माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार चांदणी चौकात सापळा रचून पोलिसांच्या पथकाने छापा टाकून संशयास्पद जीप (एम.एच.१५ एफव्ही ३९३३) रोखली. या जीपमधून पोलिसांनी सहा जनावरांची सुटका केली. या कारवाईत संशयित जावेद इस्माइल सय्यद (रा.सय्यदपिंप्री), खलील कुरेशी, जुबेर कुरेशी (दोघे रा.कुरेशी), नवल गाडे (रा.चितेगाव) यांना ताब्यात घेतले. या संशयितांची कसून चौकशी करत अवैध कत्तलखान्याविषयी माहिती घेत पोलिसांनी छापा टाकला. तेथून दोन गोवंश जातीच्या जनावरांची सुटका करण्यात आली. या कत्तलखान्यातून सुमारे १९०० किलो मांस जप्त करण्यात आले. तसेच संशयित सलीम सुलतान कुरेशी, जौदीश सुलतान कुरेशी, एजाज इसाक कुरेशी, इश्तियाक इसाक कुरेशी, कय्युम सुलतान कुरेशी, अन्वर सुलतान कुरेशी, फारुख सुलतान कुरेशी (सर्व रा. ओझर), हबीब युसूफ शेख (रा.वडाळा) अशा १३ संशयितांना पोलिसांनी अटक केली. हे सर्व संशयित वाहनामध्ये मांस भरताना रंगेहात मिळून आल्याचे पाटील यांनी यावेळी माहिती देताना सांगितले. सर्व संशयितांविरुध्द ओझर पोलीस ठाण्यात राज्य प्राणी संरक्षक कायदा व भारतीय प्राणी संरक्षक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही कारवायांमध्ये १जीप, १ओम्नी, १ कार असा १० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.