सप्तशृंग गडाचा १९.७२ कोटींचा बृहत विकास आराखडा सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:11 AM2021-07-10T04:11:13+5:302021-07-10T04:11:13+5:30
श्री क्षेत्र सप्तशृंग गड तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यासंदर्भात आमदार नितीन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ...
श्री क्षेत्र सप्तशृंग गड तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यासंदर्भात आमदार नितीन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच विविध विभाग प्रमुख, श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट विश्वस्त, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
आमदार पवार यांनी सप्तशृंग गडावरील सुचविलेल्या विकास कामांचा आराखड्यात समावेश करण्यात आला असून, प्रथम टप्प्यात उपलब्ध होणाऱ्या निधीतून कोणती कामे प्राधान्याने करावीत याबाबत चर्चा करण्यात येऊन संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्या.
सप्तशृंगी गड येथे पिण्याच्या पाण्यासाठी बंधारा, सांडपाणी प्रकल्प, पाइपलाइन, नक्षत्र बगिचा, डोम बांधणे, ११ केव्हीए एलटी वाहिनी भूमिगत करणे, भक्त निवास बांधणे व निवारा शेड बांधणे यासारख्या महत्त्वाच्या कामांचा बृहत आराखड्यात समावेश करण्यात आला.
पिण्याच्या पाण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून २ कोटी ५० लक्ष रकमेचे स्टोरेज टँक प्रस्तावित आहे. यासाठी भवानी तलावमधून पाणी न्यावे लागेल व यासाठी लागणाऱ्या विजेच्या बिलाचा भार कायमस्वरूपी ग्रामपंचायतीवर येऊ शकतो. वीज बिलाचा भार ग्रामपंचायतीवर न पडता स्टोरेज टँक घ्यावे किंवा बंधारा बांधावा याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या यंत्रणेने तपासून सविस्तर प्रस्ताव सादर करण्याची सूचना आमदार पवार यांनी केली.
सप्तशृंग गडावर सांडपाणी प्रकल्प करताना सांडपाणी कुठेही अन्यत्र मोकळे न सोडता सांडपाण्याचा पुनर्वापर होईल अशी व्यवस्था करावी यासाठी कामाची अंदाजित रक्कम १ कोटी ५० रुपये असून, कामाची पाहणी करून तात्काळ
अंदाजपत्रक सादर करण्याची सूचना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला करण्यात आली आहे.
सप्तशृंग गडावर डोम बांधण्यासाठी १ कोटी ५४ लक्ष रुपये कामांची अंदाजे रक्कम आराखड्यात असून, गडावर अद्ययावत शौचालये असावीत, महिलांसाठी जादा शौचालये असावीत यासाठी १ कोटी ५३ लक्ष रुपये कामाची अंदाजे रक्कम आहे. साइड गटारसहित रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी १ कोटी ५२ लाख रुपयांची अंदाजे रक्कम आराखड्यात असून, या कामांची पाहणी करून त्यानुसार अंदाजपत्रक तयार करून तात्काळ सादर करावे, अशी सूचना जिल्हा परिषद इवद विभागाला केली.
गडावरील नक्षत्र बगिच्या कामाची अंदाजित रक्कम १ कोटी ९४ लाख रुपये असून, वन विभागाच्या अनुमतीने अंदाजपत्रक तयार करून तात्काळ सादर करावे, अशी सूचना वनविभागाचे उपवनसंरक्षकांना केली.
वणी ते सप्तशृंग गडापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर पथदिवे बसविणे यासाठी कामाची अंदाजित रक्कम २५ लाख असून, आराखड्यात
कामांची पाहणी करून अंदाजपत्रक तयार करून तत्काळ सादर करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता यांना केली.
फोटो - ०९ सप्तशृंग गड
सप्तशृंग गड विकास आराखडा बैठकीत बोलताना आमदार नितीन पवार. समवेत जिल्हाधिकारी सूरज मांढरे, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त ललित निकम व शासकीय अधिकारी.
090721\09nsk_13_09072021_13.jpg
सप्तशृंग गड विकास आराखडा बैठकीत बोलतांना आमदार नितीन पवार. समवेत जिल्हाधिकारी सुरज मांढरे, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त ललित निकम व शासकीय अधिकारी.