‘आरटीई’अंतर्गत १९८६ प्रवेश निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 10:01 PM2020-07-27T22:01:31+5:302020-07-27T23:21:27+5:30
नाशिक : कोरोनाच्या फैलावामुळे प्रभावित झालेली आरटीई प्रवेशप्रक्रिया तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झाली असली तरी नाशिक जिल्ह्यात जुलैच्या अखेरपर्यंत प्रक्रियेतील पहिल्या टप्प्यात झालेल्या लॉटरीतील विद्यार्थ्यांचेच अद्याप १०० टक्के प्रवेश होऊ शकलेले नाही. आरटीईअंतर्गत आतापर्यंत केवळ एक हजार ९८६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, दोन हजार ४६० विद्यार्थ्यांचे प्राथमिक प्रवेश झाले असून, लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ८८१ विद्यार्थी अजूनही प्राथमिक टप्प्यातील प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क

आरटीईअंतर्गत जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपर्यंत सुमारे १९८६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, वेगवेगळ्या शाळांमध्ये २ हजार ४६० विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्राथमिक टप्पा पूर्ण झाला आहे. राज्यभरात आतापर्यंत सुमारे १५ हजार ७५८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत, तर ४० हजार ११५ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्राथमिक टप्पा पूर्ण झाला आहे. प्रवेशाचा प्राथमिक टप्पा पूर्ण केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचे अंतिम प्रवेश निश्चित केले जात असल्याने यावर्षी आरटीई प्रवेशप्रक्रियेत एकच लॉटरी झालेली असतानाही प्रवेशप्रक्रिया लांबली आहे. दरम्यान, आरटीई प्रवेशप्रक्रियेत एकाच सोडतीद्वारे प्रवेशाची संधी मिळणार असून, उर्वरित जागांसाठी प्रतीक्षा यादीही सोडतीच्याच वेळी जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीत निवड झालेल्या मुलांच्या प्रवेशासाठी पालकांना आवश्यक कागदपत्र पडताळणी समितीसमोर सादर करून प्रवेश निश्चित करावी लागणार आहे. त्यानंतर रिक्त राहणाऱ्या जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. परंतु अद्याप लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचीच प्रवेशप्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना आणखी काहीकाळ वाट पाहावी लागणार असल्याचे दिसून येत आहे. निवडीसंदर्भात संकेतस्थळावर पडताळणी आवश्यकआरटीई प्रवेशप्रक्रियेत यावर्षी आॅनलाइनपद्धतीने राज्यस्तरावरून एकच सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीद्वारे प्रवेशाची संधी मिळालेल्या व प्रतीक्षायादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना एसएमएसद्वारे माहिती देण्यात आली आहे. परंतु, लॉटरीनंतर ज्या पालकांना अद्याप एसएमएस प्राप्त झालेला नाही, त्यांनी संकेतस्थळावरून पडताळणी करावी. जिल्ह्यातील स्थिती शाळा ४४७
राखीव जागा ५,५५७
आॅनलाइन अर्ज १७,६३०
लॉटरीत निवड ५,३०७
प्राथमिक प्रवेश २,४६०
प्रवेश निश्चित १,९८६