नाशिकच्या मेनरोडच्या गणपती मंदिरात १२९ वा भाद्रपद गणेशोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 04:59 PM2019-08-29T16:59:26+5:302019-08-29T17:00:11+5:30
विविध धार्मिक कार्यक्र मांसोबत विशेष युवा संगीत समारोह
नाशिक : मेनरोड येथील गणपती मंदिरात १२९ वा भाद्रपद गणेशोत्सव दि. २ ते ७ सप्टेंबर दरम्यान साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्र मांसोबत विशेष युवा संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सवाचा प्रारंभ सोमवार, दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता ‘श्रीं’चे मेनरोडने सवाद्य मिरवणुकीने आगमन होऊन प्राणप्रतिष्ठेने होईल. मंगळवार दि.३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता प्रभाकर श्रीकृष्णशास्त्री गोडशे आणि ब्रह्मवृंद यांचा वेदोक्त मंत्रजागर होईल. याच दिवशी रात्री ९.३० वाजता नाशिकच्या युवा गायिका आर्या गायकवाड आणि रिया पोंदेयांचे शास्त्रीय गायन होईल. यानंतर नाशिकचा उदयोन्मुख युवा तबलावादक कल्याण पांडे याचे स्वतंत्र तबलावादन होईल. बुधवार, दि. ४ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजता केतकी गोºहे यांचे सतारवादन होईल. तसेच अथर्व वारे यांचे स्वतंत्र तबला वादन होईल. गुरु वार , दि. ५ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजता श्री गणेश भक्त संगीत सेवा श्री चरणी रु जू होईल. शुक्र वार , दि. ६ सप्टेंबर रोजी, रात्री ९.३० वाजता राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्राप्त युवा तबलावादक प्रफुल्ल पवार याचे एकल तबलावादन होईल. तसेच पं. शंकरराव वैरागकर यांचे शिष्य अथर्व वैरागकर यांच्या गायनाने उत्सवाची सांगता होईल. शनिवार, दि. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता सवाद्य मिरवणुकीने श्रींचे गोदाकाठी विसर्जन होईल. संपूर्ण उत्सव हा सर्वांसाठी खुला असून नाशिककर भाविक आणि संगीत प्रेमींनी कार्यक्र मांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.