सुताचे बंडल भासवून वाहून नेणारा १ कोटीचा अवैध मद्यसाठा हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 07:54 PM2020-01-06T19:54:37+5:302020-01-06T19:57:37+5:30

नाशिक : बारा टायरच्या मालट्रक मध्ये कच्चे सुताचे बंडल असल्याचे भासवून कोट्यावधींचा दारूसाठा वाहतूक करणारा मालट्रक राज्य उत्पादन शुल्क ...

2 crore illegal liquor seized by a bundle of cotton yarn | सुताचे बंडल भासवून वाहून नेणारा १ कोटीचा अवैध मद्यसाठा हस्तगत

सुताचे बंडल भासवून वाहून नेणारा १ कोटीचा अवैध मद्यसाठा हस्तगत

googlenewsNext
ठळक मुद्देएकास बेड्या ठोकण्यात आल्या सुवन अवतार सिंग या चालकाने पोबारा केलाविभागीय भरारी पथक तस्करांच्या मागावर

नाशिक : बारा टायरच्या मालट्रक मध्ये कच्चे सुताचे बंडल असल्याचे भासवून कोट्यावधींचा दारूसाठा वाहतूक करणारा मालट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हाती लागला. या कारवाईत एकास बेड्या ठोकण्यात आल्या असून, त्याचे साथीदार पसार झाले आहे. संशयीताच्या ताब्यातून हरियाणा व अरूणाचल प्रदेश निर्मीत, राज्यात  बंदी असलेला १ कोटी ४ लाख ३३ हजार ७०० रूपये किमतीच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या मद्यवाहतूकीमागे आंतरराष्ट्रीय टोळी असल्याचे बोलले जात असून, ही कारवाई वणी पिंपळगाव मार्गावरील जऊळके वणी शिवारात विभागीय भरारी पथकाने केली.
सतीश शिविसंग (रा.खानपुरा - धौलपुर,राजस्थान) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. मोठ्या प्रमाणात बेकायदा विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार विभागीय भरारी पथक तस्करांच्या मागावर असतांना वणी पिंपळगाव मार्गावरील जऊळके वणी शिवारात मद्याने भरलेला मालट्रक या विभागाच्या हाती लागला. ख कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ,अधिक्षक मनोहर अंचुळे व निरीक्षक आर.एम.फुलझळके यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक देवदत्त पोटे,एस.एस.रावते,सी.एच.पाटील, जवान दिपक आव्हाड,लोकेश गायकवाड,विठ्ठल हाके,गोकुळ शिंदे व अमन तडवी आदींच्या पथकाने गोंडेगाव फाटा येथे सापळा लावला असता एमएच ४० बीएल ४५०८ या बारा चाकी मालट्रकमध्ये राज्यात बंदी असलेला हरियाणा व अरूणाचल प्रदेशात निर्मीत मद्यसाठा मिळून आला. मालट्रकमध्ये कच्चे सुताचे बंडल असल्याचे भासवून चोरकप्यातून ही चोरटी वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. पथकाची चाहूल लागताच सुवन अवतार सिंग या चालकाने पोबारा केला असून त्याचा साथीदार सतीश शिविसंग हा संशयीत पथकाच्या हाती लागला आहे. या वाहनातून मॅकडॉल,इम्परीयल ब्ल्यू,रॉयल चॅलेंज आदी विविध प्रकारचे सुमारे ९४५ विदेशी दारूचे बॉक्स वाहतूक होत असल्याचे पुढे आले. दरम्यान सुमारे १ कोटी ४ लाख ३३ हजार ७०० रूपये किमतीच्या मुद्देमालासह अटक केलेल्या संशयीतास पथक मुख्यालयात घेवून येत असतांना द्वारका भागात संशयीताने धुम ठोकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश आले नाही. स्थानिकांच्या मदतीने त्यास पकडण्यात यश आले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मद्यवाहतूकीत आंतरराराज्य टोळीचा समावेश असल्याचे बोलले जात असून त्यादृष्टीने पथक शोध घेत आहे. अधिक तपास दुय्यम निरीक्षक देवदत्त पोटे करीत आहेत.

Web Title: 2 crore illegal liquor seized by a bundle of cotton yarn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.