जिल्ह्यातील रस्त्यांसाठी १५८३ कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 10:00 PM2020-03-08T22:00:06+5:302020-03-08T22:01:51+5:30
नाशिक : नुकत्याच जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात सुधारणांवर भर देण्यात आल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील रस्त्यांच्या सुधारणांसाठी १५८३.८७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. थेट तरतूदच करण्यात आल्याने जिल्ह्यातील १३७ रस्त्यांची दुरुस्ती होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नुकत्याच जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात सुधारणांवर भर देण्यात आल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील रस्त्यांच्या सुधारणांसाठी १५८३.८७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. थेट तरतूदच करण्यात आल्याने जिल्ह्यातील १३७ रस्त्यांची दुरुस्ती होणार आहे.
जिल्ह्यातील नियोजनसंदर्भात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील समस्या पुढे आल्याने आणि रेंगाळलेल्या प्रकल्पाकडे दुर्लक्ष झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्याकडे लक्ष घातले होते. त्यानुसार पर्यटन विकासाला निधी मंजूर झालेला आहे. आता रस्ते विकासासाठी निधी मंजूर झाल्यामुळे जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे.
विशेषत: गत सरकारच्या
काळात रस्त्यांच्या कामांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या होत्या. त्यामुळे पालकमंत्र्यांनी गत सरकारच्या काळात दुर्लक्ष केलेल्या विकासकामांना गती देण्याचे जाहीर केले होते.
राज्याच्या अर्थसंकल्पात येवला मतदारसंघातील १८ रस्त्यांसाठी ४७ कोटी रुपये मंजूर झालेले आहेत.
या निधीतून येवला मतदारसंघातील अनेक प्रलंबित रस्त्यांच्या
कामाला चालना मिळणार आहे. जिल्ह्यातील रस्त्यासंदर्भातील आलेल्या तक्रारींची दखल घेऊन राज्य महामार्गावरील गावांलगतच्या रस्त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. यात्रा तसेच पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या गावांच्या रस्त्यांनादेखील या निधीतून प्राधान्य दिले जाणार आहे.
रस्त्यांच्या दुरवस्थेसंदर्भात नियोजन बैठकीत लोकप्रतिनिधींनी या गोष्टीकडे लक्ष वेधले होते. त्यावेळी रस्त्याच्या दुरुस्तीची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली होती.
यामध्ये येवला मतदारसंघातील अनकाई-न्यायगव्हाण-पिंपळखुटे-पहाळसाठे-राजापूर प्रजिमा-७० या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी १८० लाख, प्रमुख राज्यमार्ग २ ते नैताळे ते राज्यमार्ग २७ लाख, दिंडोरी तास-खानगावथडी-तारूखेडले-तामसवाडी खेडलेझुंगे - कोळगाव - रुई - धानोरे - डोंगरगाव - विंचूर - विठ्ठलवाडी - कोटमगाव राज्यमार्ग २७ ला मिळणाऱ्या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ४ कोटी ५० लाख, पाटोदा - सावरगाव - नगरसूल -वाईबोथी - भारम प्रजिमा - ६८ रस्त्याची सुधारणा करण्यासाठी २ कोटी, रामा - १० ते तांदूळवाडी -गुजरखेडा-विखरणी-कातरणी प्रजिमा १५८ रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी ५ कोटी ५ लाख, सावरगाव-धुळगाव-एरंडगाव-भिंगारे-महालखेडा-चोरवड-दत्तवाडी - शिरवाडे प्रजिमा ७२ रस्त्याची सुधारणा करण्यासाठी २ कोटी ४० लाख, तिसगाव-बहादूरी वडनेरभैरव-वडाळीभोई रामा २५ किमी रस्त्याची सुधारणा करण्यासाठी २ कोटी ५० लाख, प्र.जि.मा. ७९ येवला गणेशपूर (सुकी) हडप सावरगांव-जायदरे प्र.जि.मा. ७० रस्ता प्रजिमा १६२ रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी २ कोटी ५० लाख, येवला पारेगाव- निमगावमढ- महालखेडा -भिंगारे -पुरणगाव ते प्ररामा-रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ५ कोटी ४९ लाख निधीस मंजुरी मिळाली आहे. लासलगाव-विंचूर रस्ता रामा क्र. ७ किमी. रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ६ कोटी अशा एकूण १८ रस्त्याच्या सुधारणेसाठी एकूण सुमारे ४७ कोटी रुपयांच्या निधीस अर्थसंकल्पातून मंजुरी मिळाली आहे.पहिल्या टप्प्यातील निधीजिल्ह्यातील रस्त्यांच्या कामासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात सुमारे दीड हजार कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर करण्यात आला असला तरी हा निधी पहिल्या टप्प्यातील आहे. दुसºया टप्प्यात मिळणाºया निधीतून प्राधान्य क्रमावर जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार आहेत.