१०२ ग्रामपंचायतींची मुदत येणार संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 12:30 AM2020-02-11T00:30:24+5:302020-02-11T01:07:58+5:30

नाशिक : पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील सुमारे १०२ ग्रामपंचायतींची मुदत आगामी दोन ते तीन महिन्यांत संपुष्टात येणार असल्याने येथील निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून आताच निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार मतदारयाद्या पडताळणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, येत्या २४ तारखेपासून अंतिम मतदारयादी तयार करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.

2 Gram Panchayats to be terminated | १०२ ग्रामपंचायतींची मुदत येणार संपुष्टात

१०२ ग्रामपंचायतींची मुदत येणार संपुष्टात

Next
ठळक मुद्देनिवडणुकीची तयारी : एप्रिल ते जूनपर्यंतचाच कालावधी

नाशिक : पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील सुमारे १०२ ग्रामपंचायतींची मुदत आगामी दोन ते तीन महिन्यांत संपुष्टात येणार असल्याने येथील निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून आताच निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार मतदारयाद्या पडताळणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, येत्या २४ तारखेपासून अंतिम मतदारयादी तयार करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.
येत्या एप्रिल आणि जून या आगामी तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील १०२ ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात येत असल्याने निवडणूक शाखेच्या वतीने लागलीच निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली असून, अधिकाऱ्यांवर जबाबदारीदेखील देण्यात आलेली आहे. कळवण तालुक्यातील २९, इगतपुरी तालुक्यातील ४, येवला तालुक्यातील २५, तर दिंडोरी तालुक्यातील ४४ या ग्रामपंचायातींची मुदत काही महिन्यांत संपुष्टात येणार असल्याने निवडणूक शाखेने आखून दिलेल्या कार्यक्रमानुसार ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या १५ फेब्रुवारी रोजी मतदारांची प्रारूप मतदारयादी, दि. १५ ते २० फेब्रुवारी या कालावधीत जाहीर करण्यात येणाºया प्रारूप मतदार याद्यांवर हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. आलेल्या हरकती निकालात काढल्यानंतर येत्या २४ रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
दरम्यान, महाआघाडी सरकारने गत सरकारचा निर्णय बदलला असून, जनतेतून सरपंच निवडण्याची प्रक्रिया रद्द करून पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधूनच सरपंच निवडीची घोषणा केल्यामुळे यंदाची निवडणूक ग्रामपंचायतींसाठी महत्त्वाची ठरणार आहे. ज्या पक्षाचे प्राबल्य त्याच पक्षाचा सरपंच हे समीकरण जुळवून येणार असल्यामुळे सरपंचांनादेखील प्रत्यक्षात काम करण्यासाठी सदस्यांचे सहकार्य मिळू शकणार आहे.
ग्रामपंचायतीची मुदत संपण्यात अवघे काही महिनेच शिल्लक असल्यामुळे गावागावात राजकीय समीकरणांची चर्चा होऊ लागली आहे. बदलेल्या राजकीय भूमिकांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे राजकारणदेखील ढवळून निघाले असल्याने जिल्ह्णातील काही ग्रामपंचायतींमध्ये धक्कादायक समीकरणे बघावयास मिळण्यासाठी शक्यता आहे. राजकीय भूमिकापेक्षा स्थानिक पातळीवरील राजकारणाला महत्त्व असल्यामुळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही तितक्याच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Web Title: 2 Gram Panchayats to be terminated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.