खरीप हंगामासाठी राज्य शासनाकडून २ लाख २० हजार मेट्रीक टन खत मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 01:51 AM2021-05-03T01:51:02+5:302021-05-03T01:52:01+5:30
सन २०२१च्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याला २ लाख ५८ हजार मेट्रिक टन रासायनीक खतांची मागणी करण्यात आली असून, शासनाने दोन लाख २० हजार २२० मेट्रिक टनास मंजुरी दिली असून, सध्या जिल्ह्यात १ लाख २५ हजार ४१९ मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे. आगामी खरीप हंगामासाठी जिल्हा कृषी विभागाने नियोजन केले असून, या वर्षी एकूण ६ लाख ६२ हजार १५४ हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी गृहीत धरण्यात आले आहे. गतवर्षी ६ लाख ५१ हजार ९२८ हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी करण्यात आली होती.
नाशिक : सन २०२१च्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याला २ लाख ५८ हजार मेट्रिक टन रासायनीक खतांची मागणी करण्यात आली असून, शासनाने दोन लाख २० हजार २२० मेट्रिक टनास मंजुरी दिली असून, सध्या जिल्ह्यात १ लाख २५ हजार ४१९ मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे. आगामी खरीप हंगामासाठी जिल्हा कृषी विभागाने नियोजन केले असून, या वर्षी एकूण ६ लाख ६२ हजार १५४ हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी गृहीत धरण्यात आले आहे. गतवर्षी ६ लाख ५१ हजार ९२८ हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी करण्यात आली होती. हंगामात शेतकरी मका पिकाला प्राधान्य देत असल्याने, या पिकाच्या क्षेत्रात दरवर्षी वाढ होत आहे. या वर्षी २ लाख ४४ हजार ६२० हेक्टरवर मकाची पेरणी होण्याचा अंदाज आहे. गतवर्षी २ लाख ३७ हजार ८२६ हेक्टरवर मकाची पेेरणी करण्यात आली होती. मका पाठोपाठ सोयाबिनचाही चांगला पेरा होत असतो. या वर्षी ८८ हजार २१४ हेक्टरवर सोयाबिनचा पेरा होण्याची शक्यता आहे. गतवर्षी सोयाबिनचे बियाने बोगस निघाल्यामुळे शेसकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती.
nगतवर्षी बहुसंख्य शेतकऱ्यांचे बियाणे उतरलेच नसल्यामुळे त्यांचा पेरणीचा खर्च वाया गेला होता. त्यामुळे गतवर्षीचा अनुभव लक्षात घेता, या वर्षी जिल्ह्यातील किती शेतकरी या हंगामात सोयाबिनची पेरणी करतील, याबाबत अंदाज बांधणे कठीण आहे. जिल्ह्यातील काही भागात कापसाचाही पेरा होत असून, या वर्षी ४२ हजार ५४० हेक्टर कापसाची लागवड होण्याचा अंदाज आहे.
nजिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी नगदी पिकांना पसंती देत असल्यामुळे जिल्ह्यात खरीप ज्वारीचे क्षेत्र कमी होत असून, गतवर्षी १९५९ हेक्टरवर ज्वारीची पेरणी करण्यात आली होती. या वर्षी ज्वारीसाठी केवळ ८७२ हेक्टर क्षत्र गृहीत धरण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील बळीराजावर चिंतेचे सावट कायम आहे.