जिल्ह्यातील २ लाख ४ हजार शेतकऱ्यांना मदत मिळालीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:11 AM2021-01-09T04:11:15+5:302021-01-09T04:11:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : जिल्ह्यात ऑगस्ट-सप्टेबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती आणी अवकाळी पावसामुळे शेतामध्ये साचलेले ...

2 lakh 4 thousand farmers in the district did not get any help | जिल्ह्यातील २ लाख ४ हजार शेतकऱ्यांना मदत मिळालीच नाही

जिल्ह्यातील २ लाख ४ हजार शेतकऱ्यांना मदत मिळालीच नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : जिल्ह्यात ऑगस्ट-सप्टेबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती आणी अवकाळी पावसामुळे शेतामध्ये साचलेले पाणी, यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संपूर्ण राज्यात अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसला. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिमध्ये तीव्रता कमी असली, तरी शेत-पिकांचे नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झाले. कांदा, मका, सोयाबीन, भात, तसेच द्राक्ष पिके हातची गेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्ह्यातही पंचनामे पूर्ण करण्यात आले. त्यानुसार, शासनाला २४२ कोटींची मदत मिळावी, असा अहवाल शासनाला पाठविण्यात आला.

अतिवृष्टीमुळे ३ लाख ६६ हजार ८३० शेतकऱ्यांचे नुकसान झाले. हेक्टरी दहा हजार तर व फळबागांना हेक्टरी २५ हजार मदत जाहीर केल्यानुसार, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पहिला ११० कोटींचा हप्ता प्राप्त झाला. १ लाख ६२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा झाली. उर्वरित शेतकऱ्यांना दिवाळीनंतर अतिवृष्टीची मदत प्राप्त होऊ शकेल, असे राज्य शासनाने जाहीर केले होते. मात्र, अजूनही उर्वरित दोन लाख शेतकऱ्यांना मदतीची रक्कम मिळू शकलेले नाही. हे शेतकरी शासनाकडून मिळणाऱ्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतीतील अनिश्चितता आणि कोरोनाचे संकट अशा वातावरणात मदतही नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

--इन्फो--

मदत कधीपर्यंत मिळणार मिळणार

दिवाळीनंतर शेतकऱ्यांना मदत मिळेल, असे शासनाने जाहीर केले होते. आता दिवाळी होऊनही तीन महिने झालेले आहेत. अजूनही आम्हाला मदत मिळालेली नाही. शासनाने उर्वरित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

- निंबा किसन भामरे, शेतकरी

--इन्फो--

उर्वरित मदतीची जिल्ह्याला प्रतीक्षा

अतिवृष्टीची पहिल्या टप्प्यातील मदत प्राप्त होऊन शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेली आहे. उर्वरित मदत अजूनही जिल्ह्याला प्राप्त झालेली नाही. शासनाकडून लवकर मदत प्राप्त होणार आहे.

- भागवत डोईफोडे

निवासी उपजिल्हाधिकारी

Web Title: 2 lakh 4 thousand farmers in the district did not get any help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.