२ लाख ६७ हजार विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:11 AM2020-12-08T04:11:47+5:302020-12-08T04:11:47+5:30
नाशिक :समग्र शिक्षण अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन गणवेश वाटप केले जातात. परंतु, यावर्षी कोरोना संकटामुळे नोव्हेंबरपर्यंत ...
नाशिक :समग्र शिक्षण अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन गणवेश वाटप केले जातात. परंतु, यावर्षी कोरोना संकटामुळे नोव्हेंबरपर्यंत सर्वत्र शाळा बंद असल्याने शासनाने मोफत गणवेश वाटपात कपात करून विद्यार्थ्यांना एकच गणवेश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या प्रत्यकेी एक गवणेश खरेदीला मंजुरी दिल्यानंतर जिल्हा परिषदेने शासनाकडे २ कोटी ६७ लाख विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदीसाठी ७ कोटी ५० लाख रुपयांच्या अनुदानाची मागणी केली आहे. गतवर्षी विद्यार्थ्यांना दोन गणवेश वाटप करण्यात आले होते. त्यामुळे सुमारे साडेपाच लाख गणवेशांसाठी तब्बल १५ लाख रुपयांची मागणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शासनाकडे केली होती. यावर्षी केवळ एकच गणवेशाचे वाटप होणार असल्याने निधीत थेट ५० टक्के कपात होणार असून, जिल्हा परिषदेनेही एका गणवेशाचा खर्च वजा करूनच निधीची मागणी केली आहे.
इन्फो-१
ग्रामशिक्षण समितीमार्फत विद्यार्थ्यांना गणवेश
शासनाने यावर्षी एकच गणवेश खरेदीला मंजुरी दिली आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने प्रस्ताव पाठविला आहे. आता निधी प्राप्त होताच तो गटस्तरावर वितरीत करण्यात येईल. त्यानंतर ग्राम शिक्षण समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणवेशाचा वाटप करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार गणवेश खरेदीचा अधिकार ग्राम शिक्षण समितीला असणार आहे.
इन्फो- २
डिसेंबरअखेरपर्यंत निधी मिळण्याची शक्यता
जिल्ह्यात यावर्षी कोरोनामुळे अद्याप शाळाच सुरू होऊ शकलेल्या नाही. त्यामुळे गणवेश वाटप होणार की नाही याविषयीच साशंकता निर्माण झाली होती. परंतु शासनाने शालेय विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक गणवेश वाटपास मंजुरी दिल्याने जिल्हा परिषदेकडून शासनाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. आता शासनाकडून डिसेंबरअखेरपर्यंत जिल्हा परिषदांना शालेय गणवेशासाठी निधी प्राप्त होण्याची शक्यता आहे.
कोट-
शासनाच्या सूचनेनुसार २ लाख ६७ हजार विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. निधी प्राप्त होताच त्याचे गटस्तरावर वाटपाचे नियोजन करून ग्राम शिक्षण समित्यांच्या खात्यावर गणवेश खरेदीसाठी हा निधी वर्ग केला जाईल. यावर्षी प्रथम सत्रात शाळा सुरू होऊ शकल्या नाही. त्यामुळे शासनाकडून प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी केवळ एकच गणवेश मंजूर झाला आहे.
- राजीव म्हसकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि. प. नाशिक
पॉइंटर-
जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी
मुले ----
मुली---
गणवेश लागणार-
२ लाख ६७ हजार
मागील वर्षी गणवेश वाटप-५ लाख ३४ हजार