जिल्ह्यात आतापर्यंतची बाधित संख्या २ लाखांवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:14 AM2021-04-06T04:14:11+5:302021-04-06T04:14:11+5:30
नाशिक : जिल्ह्यात गत महिनाभरापासून बाधितांचे प्रमाण हजाराच्या पटीत तर आठवडाभरानंतर दोन ते चार हजारांच्या पटीत वाढल्याने कोरोनाबाधित ...
नाशिक : जिल्ह्यात गत महिनाभरापासून बाधितांचे प्रमाण हजाराच्या पटीत तर आठवडाभरानंतर दोन ते चार हजारांच्या पटीत वाढल्याने कोरोनाबाधित संख्येने अल्पावधीत २ लाखांचा टप्पादेखील ओलांडला आहे. गत ५ मार्चला सव्वालाखाच्या आसपास असलेल्या बाधित संख्येने ५ एप्रिलला बाधितांचा २ लाखांचा आकडा ओलांडला आहे.
जिल्ह्यातील कोरोना मुक्त रुग्णांच्या संख्येने सोमवारी १ लाख ६५ हजारांचा आकडा ओलांडला असून डिस्चार्ज देण्यात आला असून सद्य:स्थितीत ३० हजारांहून अधिक रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. आतापर्यंत नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक ७६२, चांदवड १ हजार १४०, सिन्नर ६५२, दिंडोरी ६०४, निफाड १ हजार ८५५, देवळा ९८१, नांदगाव ४९५, येवला ३७३, त्र्यंबकेश्वर २४२, सुरगाणा १७९, पेठ ७१, कळवण ४५८, बागलाण १ हजार ६६, इगतपुरी ४४०, मालेगांव ग्रामीण ८६१ असे एकूण १० हजार १७९ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १८ हजार ०६९, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ९९९ तर जिल्ह्याबाहेरील २२५ असे एकूण ३० हजार ४७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.४० इतके आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये ८२.०७ टक्के, नाशिक शहरात ८४.५२ टक्के, मालेगावमध्ये ७५.६७ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८८.६१ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.४० इतके आहे.
इन्फो
दुसरा लाखाचा टप्पा अवघ्या साडेतीन महिन्यात
कोरोनाच्या प्रारंभापासून अर्थात मार्चअखेरीस सापडलेल्या पहिल्या रुग्णापासून १ लाखावा रुग्ण मिळेपर्यंत तब्बल साडेआठ महिन्यांचा कालावधी गेला होता. त्यानंतर १५ डिसेंबरला नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने १ लाखांचा टप्पा पार केला होता. त्यामुळे प्रारंभीच्या एक लाखांच्या टप्प्यासाठी सुमारे साडेआठ महिने तर दुसरा लाखाचा टप्पा अवघ्या साडेतीन महिन्यांच्या कालावधीत गाठला आहे.
इन्फो
गत ५० हजार अवघ्या १३ दिवसात
गत महिन्यात २२ मार्चला कोरोनाबाधितांच्या संख्येने १ लाख ५० हजारांचा आकडा ओलांडला होता. त्यानंतर अवघ्या १३ दिवसात कोरोना बाधितांच्या संख्येने अजून ५० हजार बाधित पूर्ण करीत दोन लाखांचा टप्पा ओलांडला होता.