व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची ३५ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 01:01 AM2019-11-25T01:01:55+5:302019-11-25T01:02:10+5:30

शेतकºयांकडून घेतलेल्या टमाटा मालाचे पैसे अदा न करता सुमारे ३५ लाख रुपये घेऊन दोघा व्यापाºयांनी पलायन केल्याची तक्रार शेतकºयांनी तालुका पोलिसांत दाखल केली आहे.

 2 lakh fraud of farmers by traders | व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची ३५ लाखांची फसवणूक

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची ३५ लाखांची फसवणूक

Next

नाशिक : शेतकºयांकडून घेतलेल्या टमाटा मालाचे पैसे अदा न करता सुमारे ३५ लाख रुपये घेऊन दोघा व्यापाºयांनी पलायन केल्याची तक्रार शेतकºयांनी तालुका पोलिसांत दाखल केली आहे.
मखमलाबाद, गिरणारे, दिंडोरी तालुक्यातील आशेवाडी, मातोरीसह परिसरातील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात या व्यापाºयांना टमाटा दिला. त्याचा त्यांना रोखीत लाभही झाला त्यामुळे व्यापाºयांकडे शेतकºयांची गर्दी होती. शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणात माल घेऊनही त्यांना रोखीने पैसे मिळत असल्याने शेतकºयांचा व्यापाºयांवर विश्वास बसला. त्यानंतर मात्र एक-दोन दिवसांसाठी पैसे थकविल्यानंतरही शेतकरी व्यापाºयांना माल देत होते. पैसे मिळण्याच्या अपेक्षेने शेतकºयांनी व्यापाºयांना आपला माल विकला, मात्र व्यापारी दिवस वाढवतच गेले आणि शेतकºयांशी गोड बोलून त्यांचे पैसे अडकवून ठेवले. या काळात व्यापाºयांनी बाहेरगावी माल पाठवून लाखो रु पये मिळविले. मालाची किंमत वाढत गेल्यानंतर आठ दिवसांपासून हिरे नामक व्यापारी फरार झाला.
संशयित व्यापारी अमन देवेंद्र हिरे आणि विजय आहेर यांनी शेतकºयांचा विश्वास संपादन करून लाखो रुपयांचा माल घेतला. त्यांना पैसे देण्याचे आश्वासन देऊन मालाची विक्री करूनही शेतकºयांना पैसे दिले नाहीत. त्यानंतर त्याचे कार्यालयही बंद झाल्याने फसवणूक झाली.
- विजय धात्रक, टमाटा उत्पादक

Web Title:  2 lakh fraud of farmers by traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.