व्यापाऱ्यांची २५ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 10:45 PM2020-01-03T22:45:24+5:302020-01-03T22:46:41+5:30
नाशिक-पुणे महामार्गावरील हंस कल्याण धामजवळील ममता-आनंद संकुलमध्ये सुरू करण्यात येणाºया महावीर एंटरप्रायजेस मल्टिसर्व्हिसच्या नावाखाली तथाकथित मालकाने विविध व्यापाऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू घेऊन चुकीचे व खोटे चेक देऊन सुमारे २५ लाखांची फसवणूक केली.
नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील हंस कल्याण धामजवळील ममता-आनंद संकुलमध्ये सुरू करण्यात येणाºया महावीर एंटरप्रायजेस मल्टिसर्व्हिसच्या नावाखाली तथाकथित मालकाने विविध व्यापाऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू घेऊन चुकीचे व खोटे चेक देऊन सुमारे २५ लाखांची फसवणूक केली.
प्रवीण दत्तात्रय उदावंत यांचे टागोरनगर येथे ईश्वर ज्वेलर्सचे दुकान आहे. गेल्या २५ डिसेंबरला सकाळी उदावंत यांच्या ओळखीचे वसंत मोरे हे महावीर एंटरप्रायजेस मल्टिसर्व्हिसेसचे मालक संजय माहेश्वरी यांना घेऊन आले. उदावंत यांना वसंत मोरे यांनी सांगितले की, माहेश्वरी यांना सोने खरेदी करावयाचे आहे, असे सांगितले. यावेळी माहेश्वरी यांनी उदावंत यांच्याकडे ३ लाख ६० हजार ७०० रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची आॅर्डर दिली. २८ डिसेंबर रोजी मोरे व माहेश्वरी उदावंत यांच्या दुकानात आॅर्डर दिलेले सोने घेऊन त्यांना धनादेश दिला. ३० डिसेंबरला पैसे द्यायला माहेश्वरी न आल्याने उदावंत यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता तो बंद होता. ३१ डिसेंबरला उदावंत यांच्या दुकानाशेजारी वसंत मोरे यांना वेगवेगळ्या व्यवसायाचे व्यापारी माहेश्वरी यांनी विविध वस्तू घेऊन चुकीचे व खोटे चेक देऊन आर्थिक फसवणूक केल्याचे सांगत होते. याप्रकरणी महावीर एंटरप्रायजेस विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कलर्स प्लाय प्रा. लि. अंबड प्लायवूड - २ लाख ८९ हजार, हर्षल पाटील - ५ एसी, डीपफ्रिजर - १ लाख ९३ हजार, सुनील अडवाणी- फोम व कार्पेट - ४ लाख ६८ हजार ९४०, अश्विन पटेल - लॅमिनेट खरेदी- ६६ हजार, जयेश सामानी- प्लायवूड - ३ लाख ३४ हजार ८०, जिगर सामानी- लॅमिनेट - ३७ हजार ५००, ओंकार देशमुख- बायडिंग वायर-खिळे १ लाख ६२ हजार ४७४ रुपये, मनोज मनियार-एरल लाइट-८७ हजार, जगदीश पटेल- प्लायवूड-२ लाख ८० हजार, नवीन टाटिया-बायडिंग वायर व खिळे-७६ हजार २८१ रुपये अशी एकूण २५ लाखांची फसवणूक केली.