फेरीवाल्यांकडील चिरीमिरीतून महापालिकेला ४० लाख !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 12:04 AM2020-01-19T00:04:09+5:302020-01-19T00:58:29+5:30

महापालिकेकडून फेरीवाला क्षेत्र आखूनदेखील त्याठिकाणी फेरीवाल्यांना स्थलांतरित करण्यात आले नसून सोयीच्या ठिकाणी व्यवसायासाठी अतिक्रमण विभागाचे अधिकारी कर्मचारी चिरीमिरी घेत असल्याचा आरोप स्थायी समितीमधील भाजप सदस्य दिनकर पाटील यांनी केला आहे.

2 lakh to the Municipal Corporation from Chirimiri! | फेरीवाल्यांकडील चिरीमिरीतून महापालिकेला ४० लाख !

फेरीवाल्यांकडील चिरीमिरीतून महापालिकेला ४० लाख !

Next
ठळक मुद्देस्थायी समितीत गंभीर आरोप । सभापतींनी दिले चौकशीचे आदेश

नाशिक : महापालिकेकडून फेरीवाला क्षेत्र आखूनदेखील त्याठिकाणी फेरीवाल्यांना स्थलांतरित करण्यात आले नसून सोयीच्या ठिकाणी व्यवसायासाठी अतिक्रमण विभागाचे अधिकारी कर्मचारी चिरीमिरी घेत असल्याचा आरोप स्थायी समितीमधील भाजप सदस्य दिनकर पाटील यांनी केला आहे. एका बिगाऱ्याला दहा लाख रुपये, तर माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंतच ४० लाख रुपये जमा होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी समितीच्या शनिवारी (दि.१८) झालेल्या बैठकीत केला. याप्रकरणी सभापती उद्धव निमसे यांनी चौकशीचे आदेश देतानाच या विभागातील कर्मचाºयांच्या बदल्या करण्याचेही आदेश दिले आहेत.
महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत अयशस्वी ठरलेली फेरीवाला क्षेत्र आणि रस्त्यावरील वाढते अतिक्रमण या विषयावर जोरदार चर्चा झाली. यावेळी दिनकर पाटील यांनी फेरीवाला क्षेत्र असतानाही सोयीच्या ठिकाणी व्यवसाय करू देण्यासाठी मोठ्या प्रमाणात माया जमा केली जात आहे. एक शिपायी जर दहा लाख रुपये जमा करीत असेल त्याची बदली कोण कशी काय करेल? असा प्रश्न केला. आपल्या प्रभागात शंभर फुटी मार्गावर वाहतुकीचा विचार न करता त्यावर मच्छी मार्केट आणि अन्य दुकाने थाटली असून, ती जाणीवपूर्वक हटविली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला, तर कल्पना पांडे यांनी आपल्या प्रभागातील अतिक्रमणांचा मुद्दा मांडतांना प्रशासनाला कळवूनही कार्यवाही होत नसल्याचा आरोप केला. संगीता जाधव यांनीदेखील पाथर्डी फाटा येथील अतिक्रमित बाजाराचा प्रश्न मांडला, तर सुषमा पगारे यांनी आपल्या प्रभागातील विक्रेत्यांना उपनगर येथे जागा देण्यात आली असून, तो नाशिकरोड विभागात असल्याने फेरीवाला क्षेत्र विकसित करण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले. समीर कांबळे यांनी आपल्या प्रभागात तिबेटीयन मार्केट तसेच डॉन बॉस्कोरोड येथील खाऊ गल्ली हे विक्रेते स्थलांतराचे यशस्वी प्रयोग राबविल्याचे सांगितले. सभापती उद्धव निमसे यांनी सदस्यांच्या तक्रारींची गंभीर दखल घेण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे महामार्ग आणि रहदारीचे रस्ते सोडून अन्यत्र फेरीवाला क्षेत्र करावेत, ज्या ठिकाणी व्यवसाय होईल अशाच ठिकाणी फेरीवाला क्षेत्र करावे त्यासाठी स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घ्यावे, असे सांगितले.

मेनरोडबाबत आयुक्तांकडे बैठक
अतिक्रमण निर्मूलन उपआयुक्त राहुल पाटील यांनी शहरात ५६ फेरीवाला क्षेत्र तयार करण्यात आले असून, ८० टक्के फेरीवाल्यांचे स्थलांतर करण्यात आल्याचे नमूूद केले. शालिमार आणि मेनरोड येथील विक्रेत्यांच्या स्थलांतरासाठी आयुक्तराधाकृष्ण गमे यांच्याकडे दोन बैठका झाल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे उर्वरित ठिकाणी फेरीवाला क्षेत्र तयार करण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: 2 lakh to the Municipal Corporation from Chirimiri!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.