वीस दिवसांत ३०८८ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 12:49 AM2019-09-20T00:49:44+5:302019-09-20T00:51:25+5:30

सकाळच्या सुमारास उन्हासह जाणवणारा उकाडा आणि सायंकाळी बरसणाऱ्या रिमझिम सरींच्या वर्षावाचा सध्या नाशिककर अनुभव घेत आहेत. गेल्या वीस दिवसांत जिल्ह्णात ३०८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक पाऊस इगतपुरी, पेठ आणि सुरगाणा तालुक्यांमध्ये झाला आहे.

2 mm of rain in twenty days | वीस दिवसांत ३०८८ मिमी पाऊस

वीस दिवसांत ३०८८ मिमी पाऊस

Next
ठळक मुद्देपावसाच्या सरी : सायंकाळनंतर सर्वाधिक पाऊस

नाशिक : सकाळच्या सुमारास उन्हासह जाणवणारा उकाडा आणि सायंकाळी बरसणाऱ्या रिमझिम सरींच्या वर्षावाचा सध्या नाशिककर अनुभव घेत आहेत. गेल्या वीस दिवसांत जिल्ह्णात ३०८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक पाऊस इगतपुरी, पेठ आणि सुरगाणा तालुक्यांमध्ये झाला आहे.
आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाने जिल्ह्णात महापूर आला होता. त्यामुळे जिल्ह्णातील धरणांनी शंभरी गाठली असून, प्रशासन तसेच शेतकरीदेखील समाधानी झाला आहे. या महिन्यात सातत्याने कधी पाऊस तर कधी हुलकावणी असा पावसाचा खेळ सुरूच राहिला. विशेषत: या महिन्यातील पंधरवड्यात सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने नाशिकरांची धांदल उडत आहे. गेल्या आठ दिवसांपासून आकाशात ऊन पावसाच्या पाठशिवणीचा खेळ सुरू असून, अनिश्चित पावसामुळे नाशिककरांच्या दैनंदिन व्यवहारावरदेखील परिणाम झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात ३०८८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, तर गुरुवारी ३२९ मि.मी. इतका पाऊस नोंदविण्यात आला. सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस हा इगतपुरी तालुक्यात नोंदविण्यात आला असून, ६२९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. पेठ तालुक्यात ४७४, तर सुरगाणा तालुक्यात ३९० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. येवल्यातही १३० पावसाची नोंद झाली. नाशिकमध्ये ९७.१, त्र्यंबकेश्वरला २५७ मि.मी., मालेगाव १३३, नांदगाव १९०, चांदवड १६२, कळवण ८४,बागलाण ९८, देवळा १०१, निफाड ७९,निफाड ७९, सिन्नर ७४ मि.मी. याप्रमाणे पावसाची नोंद झालेली आहे.
हवामान खात्याला हुलकावणी
बुधवार आणि गुरुवारी जिल्ह्यातील डोंगरीभागात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती; मात्र हवामान खात्याचा अंदाज खोटा ठरवित पावसाने डोंगरीभाग वगळता शहरातील भागातच हजेरी लावली. पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर येथे अनुक्रमे ९ आणि १० मि.मी. इतकाच पाऊस झाला. जिल्ह्यातील अन्य भागांत मात्र २० ते ५० मि.मी.पर्यंत पावसाची मजल गेली. विशेष म्हणजे पावसाची कमतरता जाणवणाºया सिन्नर तालुक्यात एका दिवसात ५१ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. तर निफाडसारख्या तालुक्यातदेखील २३ मि.मी. पावसा नोंदविण्यात आला. चांदवडमध्येदेखील ४१ मि.मी. पाऊस झाला. विशेष म्हणजे या तीनही ठिकाणी हंगामात कमी पाऊस झालेला असताना परतीला मात्र पावसाच्या सरी होताना दिसत आहेत.

Web Title: 2 mm of rain in twenty days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.