त्र्यंबकेश्वर तालुक्यात २० बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 10:21 PM2020-08-17T22:21:59+5:302020-08-18T01:10:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर : तालुक्यात सध्या कोरोनाचे २० पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. मार्चमध्ये महाराष्टÑात कोविडने प्रवेश केला असला तरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात जूनमध्ये हरसूलपासून शिरकाव केला. हरसूल कोरोना मुक्त झाले आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात सध्या कोरोनाचे २० पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. मार्चमध्ये महाराष्टÑात कोविडने प्रवेश केला असला तरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात जूनमध्ये हरसूलपासून शिरकाव केला. हरसूल कोरोना मुक्त झाले आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
आतापर्यंत तालुक्यात कोरोना ११२ रुग्ण होते. त्यापैकी आतापर्यंत ९१ रुग्ण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत. या ११२ रुग्णांपैकी जिल्हा परिषद हद्दीत ६१, तर नगर परिषद हद्दीत ५१ रुग्ण होते. यापैकी नाशिक रुग्णालयात एक वृद्धा मृत झाली आहे. कोविड केअर सेंटरमध्ये १२ रुग्ण, कोविड हेल्थ सेंटरमध्ये दोन रुग्ण नाशिक रुग्णालयात ३, तर ३ रुग्ण आयसोलेटेड मध्ये होम क्वॉरण्टाइन आहेत. असे २० रुग्ण उपचार घेत आहेत. सध्या त्र्यंबकेश्वरमध्ये २५ कंटेन्मेन्ट झोन करून तेथील रहिवाशांना बाहेर जाण्यास प्रतिबंधित क्षेत्रात मनाई करण्यात आली आहे.