२० फेक अकाउंट़़ ६५८ महिलांना अश्लील मेसेजेस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 01:12 AM2018-05-23T01:12:35+5:302018-05-23T01:12:35+5:30
मित्र-मैत्रिणी, नातेवाईक तसेच परिचित लोकांसोबत दैनंदिन संपर्क, जीवनातील आनंदाचे क्षण शेअर करण्यासाठी जगभरात मोठ्या संख्येने वापरले जाते ते म्हणजे फेसबुक़ इंटरनेटद्वारे नि:शुल्क सेवा असलेले अन् पॉप्युलर सोशल नेटवर्किंग माध्यम असलेल्या फेसबुकमुळे अनेक चांगल्या-वाईट घटना घडल्याचे यापूर्वी अनेकदा समोर आले आहे़
नाशिक : मित्र-मैत्रिणी, नातेवाईक तसेच परिचित लोकांसोबत दैनंदिन संपर्क, जीवनातील आनंदाचे क्षण शेअर करण्यासाठी जगभरात मोठ्या संख्येने वापरले जाते ते म्हणजे फेसबुक़ इंटरनेटद्वारे नि:शुल्क सेवा असलेले अन् पॉप्युलर सोशल नेटवर्किंग माध्यम असलेल्या फेसबुकमुळे अनेक चांगल्या-वाईट घटना घडल्याचे यापूर्वी अनेकदा समोर आले आहे़ याच फेसबुकचा विकृत मनोवृत्तीतून वापर करणाऱ्या लातूर येथील विश्वजित प्रकाशराव जोशी (२६, रा़ अवंतीनगर) या युवकास नाशिकच्या सायबर पोलिसांनी अटक केली आहे़ विशेष म्हणजे या विकृताने तब्बल २० महिलांच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट्स तयार करून याद्वारे आतापर्यंत ६५८ महिलांना अश्लील मॅसेजेस आणि व्हिडीओ कॉल केले आहेत़ तिडके कॉलनी परिसरात राहणाºया एका सव्वीस वर्षीय युवतीस सोनल शितोळे या मुलीच्या नावे फेसबुक असलेल्या अकाउंटवरून अश्लील संदेश व फोटो पाठविण्यात आले़ यामुळे या तरुणीने शितोळे नावाच्या मुलीचे अकाउंट ब्लॉक करून टाकले व आपली सुटका झाली असा तिचा समज झाला़ मात्र, या तरुणीला पुन्हा सोनल जमाल या मुलीच्या नावे असलेल्या फेसबुक अकाउंटवरून अश्लील मेसेज व फोटो येणे सुरू झाले़ या सोनल जमाल अकाउंटवरून खूप वेळा मेसेंजरवर व्हिडीओ कॉल्सही आले़ या तरुणीने यापैकी काही कॉल उचलले असता समोरून एक नग्न पुरुष व्हिडीओ कॉल करायचा, मात्र त्याचा चेहरा या व्हिडीओमध्ये दिसत नव्हता़
फेसबुकवरील सततचे अश्लील संदेश व व्हिडीओमुळे संबंधित तरुणी त्रस्त झाली होती़ अखेर तिने शहर पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली़ सायबर पोलिसांनी तक्रारकर्त्या युवतीच्या अकाउंटवरून सोनल शितोळे (फेसबुक आयडी क्रमांक - १०००१७०१२४४६४९३) व सोनल जमाल (फेसबुक आयडी क्रमांक - १०००१६५०९७३३१४६) यांचे डिटेल्स काढले़ शोध घेतला असता लातूरच्या अवंतीनगरमधील विश्वजित जोशी याचे नाव समोर आले. पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी जोशीविरोधात विनयभंग तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला़यानंतर सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराज बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली फेसबुकद्वारे महिलांना अश्लील संदेश पाठवून मानसिक त्रास देणाºया जोशी यास ताब्यात घेण्यासाठी महिला पोलीस उपनिरीक्षक जयश्री अनवणे, पोलीस हवालदार जाधव आणि पोलीस शिपाई कृष्णा राठोड यांना लातूरला रवाना करण्यात आले. या पथकाने संशयित जोशी यास अटक करून नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले असता शुक्रवारपर्यंत (दि़२५) त्यास पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़
फेसबुकवरील सततचे अश्लील संदेश व व्हिडीओमुळे संबंधित तरुणी त्रस्त झाली होती़ अखेर तिने शहर पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली़ सायबर पोलिसांनी तक्रारकर्त्या युवतीच्या अकाउंटवरून सोनल शितोळे (फेसबुक आयडी क्रमांक - १०००१७०१२४४६४९३) व सोनल जमाल (फेसबुक आयडी क्रमांक-१०००१६५०९७३३१४६) यांचे डिटेल्स काढले असता लातूरच्या अवंतीनगरमधील विश्वजित जोशी याचे नाव समोर आले.