२० जागांसाठी ४५९ अर्ज दाखल आज छाननी : पाच पदाधिकाऱ्यांच्या जागांसाठी दीडशे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 12:26 AM2017-07-28T00:26:29+5:302017-07-28T00:26:46+5:30

२० जागांसाठी ४५९ अर्ज दाखलआज छाननी : पाच पदाधिकाऱ्यांच्या जागांसाठी दीडशे अर्ज

20-jaagaansaathai-459-araja-daakhala-aja-chaananai-paaca-padaadhaikaarayaancayaa-jaagaansaathai | २० जागांसाठी ४५९ अर्ज दाखल आज छाननी : पाच पदाधिकाऱ्यांच्या जागांसाठी दीडशे अर्ज

२० जागांसाठी ४५९ अर्ज दाखल आज छाननी : पाच पदाधिकाऱ्यांच्या जागांसाठी दीडशे अर्ज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत गुरुवारी (दि.२६) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण २० जागांसाठी ४५९ अर्ज दाखल झाले. त्यात पाच पदाधिकाऱ्यांच्या जागांसाठी १५४, तर १५ संचालक पदांसाठी ३०५ अर्ज दाखल झाले.
गुरुवारी (दि. २७) अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये अध्यक्ष प्रताप सोनवणे, सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे, सरचिटणीस नीलिमा पवार, संचालक शिरीषकुमार कोतवाल, डॉ. सुनील ढिकले, विश्राम निकम, डॉ. तुषार शेवाळे यांच्यासह काही आजी-माजी संचालकांचा समावेश आहे. आतापर्यंत दाखल अर्जांमध्ये विद्यमान सर्व पदाधिकारी व संचालकांसह माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, रायुकॉँ जिल्हाध्यक्ष सचिन पिंगळे, माणिकराव बोरस्ते, नानासाहेब जाधव, मनोहर देवरे, दिलीप दळवी, उद्धव निरगुडे, बाळासाहेब पाटील, अशोक सावंत, डॉ. भाऊसाहेब मोरे, पांडुरंग सोनवणे, कैलास अहिरे, अरुण वाघ, दिलीपराव मोरे, शैलेश सूर्यवंशी, संदीप वाघ, प्रतापराव मोरे, देवराम मोगल, चंद्रभान बोरस्ते, सुनील देवरे, माजी नगरसेवक जे. टी. शिंदे, भगवंतराव बोराडे, कुमुदिनी पवार, उषा भामरे, शरद पाटील, डॉ. विलास बच्छाव, दत्तात्रय ढिकले, नारायण कोर, एन. डी. पवार, नामदेव महाले, भाऊसाहेब गडाख, राजेंद्र चव्हाणके, बाजीराव रकिबे, प्रल्हाद सोनवणे, संदीप वाघ, विजय पवार, राघो अहिरे, प्रशांत देवरे, यशवंत अहिरे, विजयकुमार निकुंभ, बाळासाहेब कोल्हे, अ‍ॅड. गंगाधर शिंदे, कोंडाजी चौधरी, भास्करराव पानगव्हाणे, भास्करराव पवार, पंडितराव भदाणे आदींचा समावेश आहे. प्रगती पॅनलच्या वतीने गुरुवारी दुपारी बारा वाजता पंडित कॉलनी येथून पदयात्रा काढून नीलिमा पवार यांच्यासह उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे पंडित कॉलनीत काहीशी वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र होते. तर समाज विकास पॅनलच्या वतीनेही अध्यक्ष प्रताप सोनवणे व सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. शुक्रवारी (दि. २८) उमेदवारी अर्जांची छाननी आहे. येत्या ३ आॅगस्टला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्याच दिवशी दोन्ही पॅनलच्या उमेदवारांची घोषणा होणार आहे.
२७ पीएचजेएल-९३- प्रगती पॅनलच्या मेळाव्यात बोलताना नीलिमा पवार. समवेत रामचंद्र बापू पाटील, शांताराम अहेर, विनायक पाटील, शशिकांत पवार, दिलीप बनकर, शोभा बच्छाव, उत्तराताई सोनवणे आदी.

Web Title: 20-jaagaansaathai-459-araja-daakhala-aja-chaananai-paaca-padaadhaikaarayaancayaa-jaagaansaathai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.