सामान्य रुग्णालयाला २० लाखांचे उपचार साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:18 AM2021-08-24T04:18:41+5:302021-08-24T04:18:41+5:30
कोरोना काळात सामान्य रुग्णालयात यंत्रसामग्रीअभावी रुग्णांवर उपचार करणे अडचणीचे झाले होते. डॉक्टरांनी कसरत करीत रुग्णांना योग्य उपचार केले. ...
कोरोना काळात सामान्य रुग्णालयात यंत्रसामग्रीअभावी रुग्णांवर उपचार करणे अडचणीचे झाले होते. डॉक्टरांनी कसरत करीत रुग्णांना योग्य उपचार केले. रुग्णांना तातडीचे उपचार मिळावेत या हेतूने आमदार मुफ्ती माेहंमद इस्माईल यांनी उपचार साहित्य व औषधांसाठी एक काेटींचा निधी मंजूर केला आहे. यातील पहिल्या टप्प्यात २० लाखांचे साहित्य रुग्णालयास देण्यात आले. सामान्य रुग्णालयात झालेल्या कार्यक्रमात आमदार मुफ्ती यांनी ऑक्सिमीटर, बी. पी. ऑपरेटर मशीन, स्टेथेस्काेप, बेड आदी साहित्य रुग्णालय प्रशासनाच्या सुपुर्द केले. शहरातील गाेरगरीब जनतेला सामान्य रुग्णालयात माेफत उपचार मिळतात. काेविडच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात प्रत्येकी ५० लाख यानुसार एक काेटीचा निधी दिला आहे. उपचारासाठी आवश्यक असलेल्या साहित्यांची यादी रुग्णालयाकडून मागविली हाेती. त्यानुसार गरजेचे साहित्य खरेदी करून उपलब्ध केले आहे. पुढील तीन टप्प्यांत एक काेटीच्या निधीतून औषध व इतर साहित्य दिले जाईल, असे आमदार मुफ्ती यांनी सांगितले. डाॅ. पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी रुग्णकल्याण समितीचे सदस्य शफिक शेख, हुसैन अन्सारी, राजेश अलिझाड, कर्मचारी आदी उपस्थित हाेते.
फोटो- २३ मालेगाव हॉस्पिटल
मालेगाव सामान्य रुग्णालयास उपचार साहित्य भेट देताना आमदार मुफ्ती माेहंमद इस्माईल.
230821\23nsk_18_23082021_13.jpg
फोटो- २३ मालेगाव हॉस्पीटलमालेगाव सामान्य रुग्णालयास उपचार साहित्य भेट देताना आमदार मुफ्ती माेहंमद इस्माईल.