मनमाडसाठी आणखी २० टॅँकर्स मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:07 AM2019-05-31T00:07:03+5:302019-05-31T00:08:10+5:30
नाशिक : मनमाड शहराचा पाणीपुरवठा गंभीर झाल्याने पाण्याचे पुढील नियोजन होईपर्यंत जिल्हा प्रशासनाने मनमाडसाठी तातडीने २० टॅँकर्स मंजूर केले आहेत. यामुळे मनमाडकरांचा पाणीप्रश्न काहीअंशी सुटणार असला तरी वाघदर्डी धरणातून पाणीपुरवठा करण्याची मागणी कायम आहे. दरम्यान, मनमाडसाठी वाढविण्यात आलेल्या २० टॅँकर्समुळे नांदगाव तालुक्यातील टॅँकर्सची संख्या ८९वर पोहोचली आहे.
नाशिक : मनमाड शहराचा पाणीपुरवठा गंभीर झाल्याने पाण्याचे पुढील नियोजन होईपर्यंत जिल्हा प्रशासनाने मनमाडसाठी तातडीने २० टॅँकर्स मंजूर केले आहेत. यामुळे मनमाडकरांचा पाणीप्रश्न काहीअंशी सुटणार असला तरी वाघदर्डी धरणातून पाणीपुरवठा करण्याची मागणी कायम आहे.
दरम्यान, मनमाडसाठी वाढविण्यात आलेल्या २० टॅँकर्समुळे नांदगाव तालुक्यातील टॅँकर्सची संख्या ८९वर पोहोचली आहे.
मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारे वाघदर्डी धरण संपूर्णपणे कोरडेठाक पडल्याने तेथील नागरिकांना २० दिवसाआड पाणी मिळत आहे. धरण कोरडे होईपर्यंत तेथील मुख्याधिकाऱ्यांनी पाण्याचे कोणतेही नियोजन केले नसल्याने नवनिर्वाचित खासदार भारती पवार यांनी मनमाडसाठी पाण्याचे नियोजन करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार करंजवणमधून वाघदर्डीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु धरणात पाणी पोहोचण्यात लागणारा वेळ लक्षात घेऊन मनमाडकरांची तहान भागविण्यासाठी तातडीने २० टॅँकर्स मंजूर करण्यात आले आहेत.
जिल्ह्णात नांदगाव तालुक्यात पाण्याची परिस्थिती भीषण आहे. जिल्ह्णात सर्वाधिक टॅँकर्स याच तालुक्यात सुरू असून, पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत आहे. त्यातही मनमाडची अवस्था अत्यंत बिकट असल्यामुळे मनमाडसाठी तातडीने नियोजन करण्याची मागणी खासदार भारती पवार यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी केली होती. त्यानुसार टॅँकर्स सुरू करण्यात येणार आहेत. वाघदर्डी धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे मनमाडकरांपुढे पाण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. वास्तविक धरण कोरडे झाल्यानंतर करंजवण धरणातून पालखेडमध्ये पाणी घेणे गरजेचे होते ते अगोदरच घेण्याचे नियोजन मुख्याधिकाºयांनी करून जिल्हा प्रशासनाला कळविणे अपेक्षित होते. मात्र त्याबाबत जिल्हा पातळीवर काहीही नियोजन नसल्याकडे खासदार भारती पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती.
येत्या २ जून रोजी करंजवणचे पाणी पालखेडमध्ये आणि तेथून ते वाघदर्डी धरणात घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. सुमारे ४९० एमसीएफटी पाणी वाघदर्डीत पोहोचणार आहे. त्यामुळे मनमाडकरांना काही प्रमाणात तरी पाणी उपलब्ध होणार आहे. तूर्तास मनमाडकरांची तहान भागविण्यासाठी २० टॅँकर्स लगेचच सुरू केले जाणार आहेत.