येवल्यात शिक्षकांकडून २० ऑक्सिजन बेड भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 09:52 PM2021-05-13T21:52:06+5:302021-05-14T00:55:28+5:30
येवला : येथील उपजिल्हा रुग्णालयास प्राथमिक शिक्षकांनी ६ लाख रुपये किमतीचे २० ऑक्सिजन बेड, वाफेचे मशीन, गरम पाणी ठेवण्यासाठी किटली आदी साहित्य भेट दिले आहे.
येवला : येथील उपजिल्हा रुग्णालयास प्राथमिक शिक्षकांनी ६ लाख रुपये किमतीचे २० ऑक्सिजन बेड, वाफेचे मशीन, गरम पाणी ठेवण्यासाठी किटली आदी साहित्य भेट दिले आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक जाणिवेतून तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी गटविकास अधिकारी डॉ. उन्मेश देशमुख, गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली निधी संकलित केला. संकलित निधीतून सदर साहित्य उपजिल्हा रुग्णालयास भेट म्हणून देण्यात आले.
प्रांताधिकारी सोपान कासार यांच्या हस्ते या सुसज्ज बेडचे उद्घाटन संपन्न झाले. या प्रसंगी तहसीलदार प्रमोद हिले, आमदार किशोर दराडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलजा कुप्पास्वामी आदींसह तालुका समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.