पोटनिवडणुकीच्या २० जागांचे निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:32 AM2018-03-01T00:32:16+5:302018-03-01T00:32:16+5:30

तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या २० जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची बुधवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला. तालुक्यातील निमगाव ग्रामपंचायतीवर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मधुकर हिरे व दीपक अहिरे यांचे समर्थक निवडून आले आहेत. जिल्हा परिषद सदस्य जे. डी. हिरे यांचे समर्थक पराभूत झाले आहेत.

 20 seats for bye-election | पोटनिवडणुकीच्या २० जागांचे निकाल

पोटनिवडणुकीच्या २० जागांचे निकाल

Next

मालेगाव : तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या २० जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची बुधवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला. तालुक्यातील निमगाव ग्रामपंचायतीवर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मधुकर हिरे व दीपक अहिरे यांचे समर्थक निवडून आले आहेत. जिल्हा परिषद सदस्य जे. डी. हिरे यांचे समर्थक पराभूत झाले आहेत. तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या २० जागांसाठी मंगळवारी शांततेत ६९.५५ टक्के मतदान झाले होते. बुधवारी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. सकाळी १० वाजता तहसिल कार्यालयातील सभागृहात मतमोजणी प्रक्रियेला प्रारंभ झाला. सहा टेबलांवर तीन फेºयांद्वारे मतमोजणीची प्रक्रिया पार पाडण्यात आली. मतमोजणीसाठी एका टेबलावर मतमोजणी सहायक, पर्यवेक्षक, शिपाई अशा तीन जणांची नेमणूक करण्यात आली होती. सहा टेबलवर एकूण १८ कर्मचाºयांद्वारे मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यात आली. गावनिहाय निवडून आलेल्या उमेदवारांची नावे व कंसात मिळालेल्या मतांची संख्या अशी : निमगाव- रंजना पवार (३३२), बापू हिरे (४३८), सुजाता हिरे (४१४), जयश्री बागुल (४७९), कलावती हिरे (६०९), सुनंदा अहिरे (५४१), नाळे - मधुकर धनवट (८५), माया बागुल (बिनविरोध), पळासदरे- राजेंद्र चव्हाण (१७८), झोडगे- दीपाली देसले (४५५), ज्वार्डी बुद्रुक- दमयंती अहिरे (२३९), भूषण दैतकार (२२३), कैलास दैतकार (बिनविरोध), अलकाबाई वाघ (बिनविरोध), दसाणे- वेदीका पवार (२०८), वºहाणे- पंकज खैरनार (२४४), साजवहाळ- विमलबाई ठाकरे (२७२), शोभा जाधव (बिनविरोध), लेंडाणे- कविता सोनवणे (२७०), दिपाली चव्हाण (२६०), नगाव दि- सरला शेलार (२११), करंजगव्हाण- कविता सोनवणे (४१३), लोणवाडे- द्रोपदाबाई माळी (१९५), युवराज गोलाईत (१५९), किरण वाघ (बिनविरोध). सदर मतमोजणी प्रक्रिया नायब तहसीलदार एम. एस. कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लिपिक शेखर अहिरे, अंबोरे, संजय काळे, तलाठी व मंडल अधिकाºयांनी पार पाडली. पोटनिवडणुकीच्या निकाला नंतर विजयी झालेल्या उमेदवारांच्या समर्थकांनी तहसील आवारात गुलालाची उधळण करीत विजयोत्सव साजरा केला.
बिनविरोध निवड झालेल्या ग्रामपंचायती व उमेदवारांची नावे- वनपट- अरुणा शिंदे, रामदास शिंदे, विद्या शिंदे, युवराज शिंदे, हिसवाळ- अक्काबाई गायकवाड, पाथर्डे- शोभाबाई नरोटे, कौळाणे (गा.)- काशिनाथ वाघदरे, हिरालाल पुंडे, सुरुबाई पुंडे, बेबाबाई शिंदे, प्रतिभा मगर, दशरथ सोनवणे, कलाबाई अहिरे, देवघट- स्मीता पगार, हताणे- मनिषा बिरारी, कविता थोरात, गुगुळवाड- बायजाबाई निकम, उत्तम सोनवणे, डाबली- वंदना सोनवणे, चिखलओहोळ- सुनिल कुवर, निमशेवडी- रंजना कन्नोर, वळवाडे- पूनम देशमुख, खाकुर्डी- सुर्यकांत वाघ, झाडी- बाबाजी सूर्यवंशी, नांदगाव बुद्रुक- योगेश जगताप.

Web Title:  20 seats for bye-election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.