२०० वीजजोडण्या खंडित; थकबाकीदारांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 10:40 PM2019-03-19T22:40:27+5:302019-03-20T01:05:43+5:30
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या पंचवटी विभागामार्फत १ एप्रिल २०१८ ते १७ मार्च २०१९ या आर्थिक वर्षात साडेअकरा महिन्यांच्या कालावधीत ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपैकी ८१ कोटी ५० लाख रुपयांची वीज बिल वसुली करण्यात आली आहे. वीज वितरण कंपनीने यंदा पंचवटी विभागासाठी सुमारे ८४ कोटी ७६ लाख रु पयांचे वीज बिल वसुलीचे उद्दिष्ट ठेवले होते.
पंचवटी : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या पंचवटी विभागामार्फत १ एप्रिल २०१८ ते १७ मार्च २०१९ या आर्थिक वर्षात साडेअकरा महिन्यांच्या कालावधीत ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपैकी ८१ कोटी ५० लाख रुपयांची वीजबिल वसुली करण्यात आली आहे. वीज वितरण कंपनीने यंदा पंचवटी विभागासाठी सुमारे ८४ कोटी ७६ लाख रु पयांचे वीज बिल वसुलीचे उद्दिष्ट ठेवले होते.
वीज वितरण कंपनीचे पंचवटी विभागात मखमलाबाद नाका दिंडोरीरोड, आडगाव नाका, बाजार समिती परिसर, तपोवन व पंचवटी गावठाण असे सहा कक्ष कार्यालय आहेत. या सहा कक्ष कार्यालयाच्या अखत्यारित सुमारे ७५ हजार वीजग्राहक आहेत. यापैकी निवासी घरगुती विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांची संख्या ६७ हजार इतकी, तर आठ हजार व्यावसायिक वापर करणाऱ्या वीजग्राहकांची संख्या आहे. वीज वितरण कंपनीच्या कक्षेत येणाºया विभागांमध्ये उच्चभ्रू वसाहत तसेच झोपडपट्टी परिसराचादेखील समावेश आहे.
वीज वितरण कंपनीने पंचवटी विभागाला ठरवून दिलेल्या ८४ कोटी ७६ लाख रु पयांच्या उद्दिष्टांपैकी सुमारे ८१ कोटी ५० लाख रु पयांची वीज बिल वसुली करण्यात आल्याने यंदाच्या वर्षी अंदाजे ९८ टक्के
वीज बिलाची रक्कम वसुली झाली आहे.
विज देयके अदा केल्यानंतर देखील वीज देयकांची रक्कम थकविणाºया थकबाकीदारांविरुद्ध कारवाई करण्यात आलेल्या वीजग्राहकांची संख्या २००हून अधिक असल्याचे पंचवटी वीज
वितरण कंपनी मार्फत सांगण्यात आले आहे.
मोबाइलद्वारे संदेश नोटिसा
वीजग्राहकांनी वेळेत वीज बिल भरणा करावा यासाठी सुमारे १६ हजार ६४६ वीजग्राहकांना मोबाइलद्वारे संदेश नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. थकबाकीदारांकडून वीजदेयकांची वसुली करण्यासाठी विभागात १५० वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये कक्ष अधिकारी, सहायक अभियंता, वायरमन व कार्यालयीन कर्मचाºयांचा समावेश आहे.