मुसळगाव प्राथमिक शाळेत २०० उपकरणांची मांडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 05:57 PM2019-03-17T17:57:35+5:302019-03-17T17:57:56+5:30
सिन्नर : तालुक्यातील मुसळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेयअतंर्गत विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात सुमारे २०० हून अधिक प्रयोग विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात मांडले होते.
मुख्याध्यापक भास्कर ठाकरे याच्या मार्गदर्शनाखाली या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. छोट्या वैज्ञानिकांचे मनोबल वाढावे, त्यांच्या कल्पनाशक्तीचा विकास व्हावा या उद्देशाने शालेयपातळीवर हे प्रदर्शन भरविण्यात आले होते. मुसळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख भुजबळ यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला.एटीएम मशीन, पेनपासून बनविलेला हातपंप, सौरऊर्जेवर चालणारी बोट, लॉकर क्रेन आदी विविध एकाहून एक सरस चिमुकल्यांनी बनविलेले वैज्ञानिक प्रयोग आकर्षण ठरत होते. विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता, त्यांच्या कल्पकतेला वाव देणारे मार्गदर्शक शिक्षक यांचे उपस्थितांनी कौतुक केले. याप्रसंगी शिक्षक वैशाली सायाळेकर, वसंत गोसावी, राजेंद्र शेजवळ, उषा चव्हाण, अशोक कासार, रोहिणी राजगुरू, नवनाथ हांडगे, अनिता येवले, नंदा महाले, विकास गुंजाळ, विशाखा वर्पे, स्वाती रोहोकले, रवींद्र चौरे, कल्पना जगताप, पंढरीनाथ मांगते, मोहन शिरसाठ, रामहरी भालेराव, स्मिता पाटील आदी उपस्थित होते.