नंदुरबार जिल्'ात कोरोनाच्या संकट काळात 20 हजार मजूरांच्या हाताला काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 05:37 PM2020-05-10T17:37:37+5:302020-05-10T17:37:56+5:30
कोरोनाच्या संकटकाळात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याची ओरड एकीकडे होत असताना दुसरीकडे प्रशासनातर्फे विशेष मोहिमेंतर्गत ग्रामीण भागात विविध कामे हाती घेऊन खात्रीचा रोजगार व मजुरी उपलब्ध करून देण्यात येत आहे. नाशिक महसूल विभागात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आदिवासी नंदुरबार जिल्'ात सुमारे 20 हजारपेक्षा अधिक मजूरांना रोजगार उपलब्ध झाल्याचे शुभवर्तमान आहे.
नाशिक : कोरोनाच्या संकटकाळात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याची ओरड एकीकडे होत असताना दुसरीकडे प्रशासनातर्फे विशेष मोहिमेंतर्गत ग्रामीण भागात विविध कामे हाती घेऊन खात्रीचा रोजगार व मजुरी उपलब्ध करून देण्यात येत आहे. नाशिक महसूल विभागात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आदिवासी नंदुरबार जिल्'ात सुमारे 20 हजारपेक्षा अधिक मजूरांना रोजगार उपलब्ध झाल्याचे शुभवर्तमान आहे.
जिल्'ात मनरेगा अंतर्गत शेल्फवर 32 हजार कामे ठेवण्यात आली असून, त्यातील 31 हजार अपूर्ण कामे उपलब्ध आहेत. 393 ग्रामपंचायतीमध्ये ही कामे सुरू करण्यात आली आहेत. यात अक्राणी तालुक्यात सर्वाधिक 4720 मजूर कामावर असून, नंदुरबार 2377, नवापूर 3920, शहादा 3454 आणि तळोदा तालुक्यात 2425 मजूर कामावर आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून आणि मास्क घालून ही कामे करण्यात येत आहेत. मजूर संख्येच्या बाबतीत नंदुरबार जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर असून 40 हजार मजूरांना रोजगार उपलब्ध करून देत जिल्'ाला पहिल्या क्रमांकावर आणण्याचे उद्दिष्ट पालकमंत्री के. सी. पाडवी व जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी ठेवले आहे.
-------
दीड कोटींची कामे ...
जिल्'ात मस्टर संपल्यानंतर आठ दिवसाच्या आत 100 टक्के मजूरांच्या खात्यावर मजूरीची रक्कम थेट जमा करण्यात येत असून आतापर्यंत दीड कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक चलन वलनाला हातभार लागत आहे. कृषी विभागातर्फे 73, वन विभागातर्फे 93, सामाजिक वनीकरण विभागातर्फे 23 आणि ग्रामपंचायत स्तरावर 3424 कामे सुरू आहेत.