अल्पवयीन मुलगी अपहरण, बलात्कारप्रकरणी शिक्षकास सक्तमजुरी दिंडोरी येथील २०१३ ची घटना
By admin | Published: February 17, 2015 01:00 AM2015-02-17T01:00:57+5:302015-02-17T01:01:37+5:30
अल्पवयीन मुलगी अपहरण, बलात्कारप्रकरणी शिक्षकास सक्तमजुरी दिंडोरी येथील २०१३ ची घटना
नाशिक : शिकवणीसाठी येणाऱ्या अल्पवयीन मुलीस तुझ्या मावशीने बोलावल्याचे खोटे सांगून विविध ठिकाणी नेऊन अत्याचार करणारा आरोपी प्रमोद दत्तात्रय जाधव या शिक्षकास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला फलके-जोशी यांनी सोमवारी दहा वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ २० फे ब्रुवारी २०१४ रोजी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती़ आरोपी प्रमोद दत्तात्रय जाधव (३४, राक़ेतकी हॉटेलमागे, ता़ दिंडोरी, जि़नाशिक) हा व्यवसायाने शिक्षक असून, तो शिकवणीचे काम करीत असे़ त्याच्याकडे चौदा वर्षीय मुलगी शिकवणीसाठी येत होती़ २३ डिसेंबर २०१३ ते २० फेब्रुवारी २०१४ या कालावधीत जाधवने मुलीस तुझ्या मावशीने बोलावल्याचे खोटे सांगून तिचे अपहरण केले़ यानंतर नाशिक, सुरत, अहमदाबाद, उदयपूर या ठिकाणांवरील लॉजवर नेऊन कुटुंबीयांना मारून टाकण्याची धमकी देत वेळोवेळी अत्याचार केला़ या प्रकरणी तिच्या वडिलांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादिनुसार आरोपी प्रमोद जाधवविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता़ हा खटला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला फलके-जोशी यांच्या न्यायालयात सुरू होता़ या खटल्यात सरकारी वकील अॅड़ सुप्रिया गोरे यांनी पाच साक्षीदार तपासून न्यायालयासमोर भक्कम पुरावे सादर केले़ आरोपी प्रमोद जाधवला या गुन्'ात दोषी ठरवून दहा वर्षे सक्तमजुरी व वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ (प्रतिनिधी)