पोर्टलवर २०४ बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:12 AM2021-06-20T04:12:07+5:302021-06-20T04:12:07+5:30
नाशिक : कोरोनाबळींची नोंद पोर्टलवर अपडेट करण्याचे काम शनिवारीही (दि.१९) सुरूच असून, दिवसभरात एकूण २०४ बळींची नोंद झाली ...
नाशिक : कोरोनाबळींची नोंद पोर्टलवर अपडेट करण्याचे काम शनिवारीही (दि.१९) सुरूच असून, दिवसभरात एकूण २०४ बळींची नोंद झाली आहे. त्यात नाशिक मनपा क्षेत्रातील ११२, तर नाशिक ग्रामीणमधील ९२ आणि मालेगाव मनपाच्या २ बळींचा समावेश आहे.
शनिवारच्या एका दिवसात एकूण चार नागरिकांचा बळी गेला असून, त्यात दोन नाशिक ग्रामीणचे, एक मालेगाव मनपा क्षेत्रातील, तर एक नाशिक मनपा क्षेत्रातील आहे. कोरोना मृत्यूच्या नोंदी दोन दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर शनिवार हा दुसरा दिवस होता. त्यामुळे रविवारी बळी संख्या अपडेट करणे थांबणार की नाही, याबाबत अद्यापही संभ्रम आहे. प्रत्यक्ष बळी आणि पोर्टलवरील बळींच्या संख्येत दिसणारी तफावत भरून काढण्यासाठी गुरुवारपासून पोर्टलवर बळींची संख्या अपडेट करण्यात येत आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या अपडेट बळींमुळे एकूण बळींची संख्या ७,७३१ वर पोहोचली आहे.
इन्फो
नवीन बाधित ११४, कोरोनामुक्त २३१
जिल्ह्यात शनिवारी एकूण रुग्णसंख्येत ११४ ने वाढ झाली, तर २३१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नवीन कोरोनाबाधितांमध्ये ५६ रुग्ण नाशिक ग्रामीणचे, ५१ रुग्ण नाशिक मनपाचे, ०३ मालेगाव मनपाचे, तर ४ जिल्हाबाह्य क्षेत्रातील आहेत. नवीन कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने शंभरच्या आसपास राहत असली तरी त्यातही अजून घट येणे आवश्यक आहे.