शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करून २०८ शाळा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:11 AM2021-07-21T04:11:47+5:302021-07-21T04:11:47+5:30

नाशिक : आठवी ते बारावीच्या ग्रामीण भागातील शाळा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. परंतु अद्याप जिल्ह्यातील अनेक शिक्षकांचे लसीकरण होऊ ...

208 schools started by RTPCR testing of teachers | शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करून २०८ शाळा सुरू

शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करून २०८ शाळा सुरू

Next

नाशिक : आठवी ते बारावीच्या ग्रामीण भागातील शाळा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. परंतु अद्याप जिल्ह्यातील अनेक शिक्षकांचे लसीकरण होऊ शकलेले नाही. त्यामुळे कोरोनामुक्त गावात ज्या ठिकाणी शाळा सुरू आहेत, अशा २०८ शाळांच्या ठिकाणी शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील ३३५ कोरोनामुक्त गावांपैकी २०८ शाळांमध्ये सोमवारी (दि. १९) प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा घंटा वाजली. उर्वरित शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनामुक्त गावांतील शाळा सुरू करताना शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून, ज्या शिक्षकांची चाचणी झालेली आहे, अशाच शिक्षकांनी पहिल्या दिवसापासून शाळेत विद्यार्थ्यांना अध्यापन सुरू केल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. जिल्ह्यातील कोरोना स्थिती आणि कोरोनापश्चात आजारांबाबत आढावा घेतल्यानंतर शनिवारी (दि. १७) जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाच्या शाळा सुरू करण्याबाबतच्या सूचनांनुसार ग्रामीण भागातील ज्या गावांत मागील एका महिन्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही, अशा गावांतील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली होती. त्यानुसार जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

---

पॉइंटर-

आठवी ते बारावीपर्यंतचे एकूण शिक्षक - १०,२१७

पहिल्या दिवशी सुरू झालेल्या शाळा - २०८

पहिल्या दिवशी टेस्टिंग करून शाळेत आलेले - ६२४

----

आठवी ते बारावीचे विद्यार्थी

वर्ग - मुले - मुली - एकूण

आठवी - ६२३८७ - ५५९४५ - ११८३३२

नववी - ६१३६२ - ५४५४८ - ११५९१०

दहावी - ५९८२४ - ५१५९७ - १११४२१

अकरावी - ५२८०३ - ४६१४६ - ९८९४९

बारावी - ३५६०७ - ३२५५३ - ६८१६०

---

पहिल्या दिवशी २०८ शाळा उघडल्या

पूर्वसूचनेमुळे शिक्षकांनी करून घेतली चाचणी

राज्य शासनाने कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्यासंदर्भात पूर्वसूचना दिली होती. त्यामुळे माध्यमिक शिक्षकांनी पुढाकार घेऊन त्यांची कोरोना चाचणी करून घेतली होती. जिल्ह्यात २०८ शाळा सोमवारपासून सुरू झाल्या. या शाळांमध्ये जवळपास सव्वासहाशे शिक्षकांनी कोरोना चाचणी केल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच अध्यापन सुरू केले आहे.

----

राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील ३३५ शाळा कोरोनामुक्त आहेत. त्यापैकी २०८ शाळा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. त्यासाठी शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून, टप्प्याटप्प्याने अनुकूल परिस्थितीनुसार आणखी शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण व आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे.

- डॉ. वैशाली झनकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी

Web Title: 208 schools started by RTPCR testing of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.